वज्रमुठ सुटली? नाना पटोले यांचा स्बबळाचा नारा

काँग्रेस मविआसोबत किंवा स्वबळावर लढली तरी राज्यात नंबर एकचा पक्ष होऊ शकते नाना पटोलेंचा विश्वास

वज्रमुठ सुटली? नाना पटोले यांचा स्बबळाचा नारा

कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेसचा भाव वधारणार अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात तसे घडताना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. महापालिकेत काँग्रेस हे स्वबळ आजमवण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी रविवारी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक झाली. कर्नाटकमध्ये जर भाजपाचा पराभव होऊ शकतो तर महाराष्ट्रातही होऊ शकतो, त्यामुळे भाजपाला चीतपट करण्यासाठी या बैठकीत रणनीतीवर चर्चा झाली. मविआच्या नेत्यांनी बैठकीत ऐक्याची वज्रमुठ वळली. प्रत्यक्षात ही वज्रमुठ ढिली होताना दिसत आहे.

बैठकीला दोन दिवस उलटून जाण्याच्या आता काँग्रेसने आपले रंग दाखवले आहेत. काँग्रेस मविआसोबत किंवा स्वबळावर लढली तरी राज्यात नंबर एकचा पक्ष होऊ शकते, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेसने स्वबळाची चाचपणी करायला सुरूवात केलेली आहे.

हे ही वाचा:

‘गोल्फादेवी’चा जयजयकार, समर्थ स्पोर्टसही विजेते

काँग्रेसमुळे कर्नाटकच्या डोक्यावर ६२ हजार कोटींचा ‘फुकट’चा भार वाढणार

सीबीआयने बेनामी संपत्तीवाल्यांच्या आणले नाकी ‘नऊ’

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा धडाका

महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने सर्वेक्षण केले असून महापालिकेतही काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकेल, असे चित्र आहे, त्यामुळे काँग्रेस महापालिकेतही स्वबळाचा विचार करीत असल्याचे पटोले म्हणाले. काँग्रेस स्वबळाचा भाषा करून आघाडीत आपली वाटाघाटीची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करते आहे.

महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस जरी चौथ्या क्रमांकाचा पक्ष असला तरी आगामी महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये समान वाटा हवा म्हणून कांग्रेस आग्रही आहे. त्यासाठीच स्वबळाचा नारा देण्याची रणनीती पटोले राबवत आहेत, असे मत आघाडीतीलच एका नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केले आहे.

Exit mobile version