पश्चिम बंगालमध्ये यावर्षी एप्रिल-मे महिन्यात विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी युतीची घोषणा केली आहे. परंतु त्याचबरोबर फुरफुरा शरीफचे मौलवी अब्बास सिद्दीकी यांनी नव्याने सुरु केलेला पक्ष इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या पक्षाशीसुद्धा युती करणार असल्याचेघोषीत केले आहे.
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पश्चिम बंगालमधील कार्यालयात डाव्या नेत्यांशी बैठक घेतल्यानंतर त्यांनी आयएसएफशीदेखील युती करणार असल्याचे सांगितले. आयएसएफ व्यतिरिक्त, बिहारमधील लालू प्रसाद यादव यांचा पक्ष आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी देखील युती करणार असल्याचे अधीर रंजन चौधरी यांनी घोषित केले.
हे ही वाचा:
आयएसएफ हा पक्ष मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. आयएसएफ ची स्थापना केली तेंव्हा, एमआयएम या पक्षाशी युती करणार असल्याची माहिती होती. परंतु आता आयएसएफ काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी युती करणार असल्याचे कळत आहे. पश्चिम बंगालमध्ये ३५% पेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे. मालदा, मुर्शिदाबाद आणि उलूबेरिया या जिल्ह्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्या जवळपास ५०% च्या जवळ आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसपक्षाला सर्वाधिक मुस्लिम मते मिळतात. या युतीमुळे ममता बॅनर्जींना धक्का बसणार आहे.
हे ही वाचा:
बंगाल निवडणुकीच्या तोंडावर सरसंघचालक मोहन भागवत मिथुनच्या भेटीला
पश्चिम बंगाल विधानसभेच्या २९४ जागांपैकी १९३ जागांवर काँग्रेस आणि डाव्या पक्षांची युती निश्चित झाली आहे. यातील १०१ जागा डावे पक्ष तर काँग्रेस पक्ष ९२ जागांवर निवडणूक लढवणार आहेत.
याचबरोबर आयएसएफ या पक्षाने ६५-७० जागांवर निवडणूका लढवण्याची मागणी केली आहे.