28 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणजाहिरातबाजी...काँग्रेस पक्षाची... फुटकळ कामांची...

जाहिरातबाजी…काँग्रेस पक्षाची… फुटकळ कामांची…

Google News Follow

Related

नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी ही पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. त्याहीपेक्षा सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरत आहेत. भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारची आणि काँग्रेस पक्षाची खिल्ली उडवली आहे.

“सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा. या होर्डिंग च्या किमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या.” असं ट्विट अतुल भातखळकरांनी  केलं आहे.

सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात लहान पक्ष आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या स्थानिक पक्षांपेक्षा कमी आमदार काँग्रेस पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षाचे निवडून आल्यामुळे काँग्रेसवर ही परिस्थिती ओढवली आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत काँग्रेस पक्ष हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष होता आणि काँग्रेसचे मुख्यमंत्रीही महाराष्ट्रात होते.

हे ही वाचा :

एक लाख कोरोनायोद्धे तयार करणार

येडियुरप्पा- जयंत पाटील का भेटत आहेत?

भारत न्यूझीलंड कसोटी जगज्जेतेपदाचा अंतिम सामना आजपासून रंगणार

कोरोना आकडेवारीत पुन्हा घट

त्यामुळे आता काँग्रेस पक्षावर आता जुन्या छत्र्या दुरुस्त करण्याचे फलक लावण्याची वेळ आली आहे. पक्षाला उभारी देण्यासाठी छत्र्या मोफत दुरुस्त करण्याच्या उपक्रमाचा प्रसार केल्यामुळे काँग्रेस पक्ष सध्या थट्टेचा विषय ठरला आहे. नेटकऱ्यांनी हे पोस्टर्स व्हायरल करून त्याच्या आधारे आपल्या प्रतिभेला वाट मोकळी करून दिली आहे. पक्षाला अध्यक्षपदाचे छत्र नाही मग या छत्र्या दुरुस्त करून काय होणार. पक्ष सावरण्यासाठी आधी दुरुस्त्या करा, अशी विचारणा नेटकरी करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा