…कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेसचेच नेते कुजबुजले

…कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेसचेच नेते कुजबुजले

कर्नाटकातील दोन काँग्रेस नेत्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचारावर चर्चा केल्याचा व्हिडिओ बुधवारी भाजपाचे आयटी विभागाचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी ट्विट केला आहे.

माजी खासदार व्हीएस उग्रप्पा आणि पक्षाचे मीडिया समन्वयक सलीम हे दोघे काल एका पत्रकार परिषदेला संबोधित करण्यापूर्वी एकमेकांशी कुजबुजत डीके शिवकुमार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर चर्चा केली होती. यामध्ये डीके शिवकुमार यांच्या एका सहकार्याने ५०-१०० कोटी रुपये भ्रष्टाचाराने मिळवल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या देवाणघेवाणीत दोघांनी श्री शिवकुमार यांना “मद्यपी” म्हणून देखील संबोधले.

“काँग्रेसचे माजी खासदार व्ही एस उग्रप्पा आणि केपीसीसी मीडिया समन्वयक सलीम चर्चा करतात की पक्षाचे अध्यक्ष डीके शिवकुमार लाच कशी घेतात, आणि त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने ५०-१०० कोटींपर्यंत कमाई केली आहे, ते बोलत असताना कसे तोत्रे बोलतात यावरही ते चर्चा करत आहेत. ते मद्यधुंद असल्याचे वाटते असेही ते म्हणाले.” असे अमित मालवीय यांनी लिहिले.

हे ही वाचा:

एअर इंडिया नंतर मोदी सरकार ‘या’ कंपनीचे खासगीकरण करणार

राजस्थानमधील काँग्रेसचे मंत्री म्हणाले, महिला कर्मचारी म्हणजे डोकेदुखी!

मोदी सरकारच्या योजना मानवाधिकारांचं जतन करणाऱ्या

काय आहे १०० लाख कोटींची गती शक्ती योजना?

शिवकुमार म्हणाले की, “त्यांना या प्रकरणावर टिप्पणी करायची नाही (परंतु) शिस्तपालन समिती कडक कारवाई करेल.” काँग्रेसकडून मात्र उग्रप्पा यांनी असे स्पष्ट केले आहे की त्यांचे सहकारी त्यांना भाजपकडून लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल (शिवकुमार यांच्यावर) जाणीव करून देत होते.

Exit mobile version