26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारण'त्या' भेटीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत तणाव?

‘त्या’ भेटीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीत तणाव?

Google News Follow

Related

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीच्या वृत्तानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील दरी वाढली आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवार यांची तब्येत खराब असून बुधवारी शस्त्रक्रिया होणार आहे, असं पक्षाने स्पष्ट केल्यानंतर देशातील विविध नेत्यांनी विषेशतः केंद्र सरकारमधील पंतप्रधानापासून अनेक मंत्र्यांनी त्यांची विचारपूस केली. शरद पवार यांनी देखील ट्विटरवरून त्यांचे आभार मानले. पण विचारपूस करणाऱ्याच्या ट्वीटमध्ये दिल्लीतील राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांचा उल्लेख नाही. त्यामुळे एकीकडे भाजपच्या नेत्यांची शरद पवारांशी जवळीक वाढू लागलीय, तर काँग्रेसचे नेते पवारांपासून अंतर ठेवून आहेत, असं दिसून येत आहे.

थोड्याच दिवसपूर्वी शरद पवार यांनी यूपीएचे अध्यक्ष व्हावं, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त करत टीका देखील केली होती. संजय राऊत यांच्या वक्तव्याचाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संबंधांवर परिणाम झाल्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील याबाबत संजय राऊत संपादक आणि खासदार यात गफलत करत आहेत का? असा प्रश्न विचारला आणि याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल असे सूतोवाच केले.

भाजपकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर या दिल्लीतील नेत्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार या राज्यातील नेत्यांनी फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. स्वतः शरद पवार यांनीच ट्वीट करून त्यांचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा:

ठाकरेंना भारतरत्न, राऊतांना नोबेल

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

बेगम ममता बंगालला मिनी पाकिस्तान बनवेल

‘होला मोहल्ला’ दंगलप्रकरणात १७ जणांना अटक

मात्र काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे, भालचंद्र मुणगेकर या राज्यातील नेत्याकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आहे. त्यांनी तसं ट्वीट देखील केलं आहे. पण दिल्लीतील एकाही नेत्यांने विशेषतः राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी मात्र पवारांना याबाबत फोन केला नाही. ज्यांचे प्रकृतीच्या चौकशीसाठी फोन आले त्यांचे शरद पवारांनी ट्वीट करून आभार मानलेत. या ट्वीटवरूनच दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांचा पवारांना फोन आला नसल्याचं स्पष्ट होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा