मध्य प्रदेशात ‘हिंदुत्वा’च्या अजेंड्यामुळे काँग्रेसमध्ये कलह

यामुळेच सर्वसामान्य मतदार काँग्रेसवर निवडणुकीपुरते हिंदू अशी टीका करतात.

मध्य प्रदेशात ‘हिंदुत्वा’च्या अजेंड्यामुळे काँग्रेसमध्ये कलह

मध्य प्रदेशमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसने भाजपच्या हिंदुत्व कार्डाला शह देण्यासाठी ‘सॉफ्ट हिंदुत्व’चा प्रयोग राबवण्याची योजना आखली आहे. मात्र पक्षाचा हाच ‘सॉफ्ट हिंदुत्व’चा अजेंडा पक्षामध्ये कलहाचे कारण ठरत आहे. ‘भारतात जर ८२ टक्के हिंदू राहतात, तर त्याला हिंदू राष्ट्र बनवण्याची गरजच काय? आकडे खरे काय तेच सांगतात,’ असे विधान मध्यप्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी केले होते.  

नुकतेच छिंदवाडा येथे त्यांनी एक कथाकथनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. एप्रिलमध्ये भोपाळमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या कार्यालयात ‘धर्मसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. या कार्यक्रमात मध्यप्रदेशातील मठ, मंदिरांचे पुजारी आणि धर्मोपासक सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे कार्यालय भगव्या झेंड्यांनी सजवण्यात आले होते. मात्र काँग्रेसच्या याच रणनीतीचा उघडपणे विरोध होऊ लागला आहे.

हे ही वाचा:

चंद्रावर कसं उतरलं प्रज्ञान रोव्हर?

इस्रोचे पुढील लक्ष्य ‘आदित्य -एल १’

पुतिन यांनी वाहिली श्रद्धांजली म्हणजे प्रिगोझिन यांचा मृत्यू झाला हे नक्की!

… म्हणून जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवले    

ज्येष्ठ काँग्रेस नेते अजीज कुरेशी यांनी विदिशातील लटेरी येथे अल्पसंख्याक संमेलनात केलेल्या वादग्रस्त वक्तल्यामुळे काँग्रेस नेत्यांची झोप उडाली आहे. पक्ष कार्यालयात मूर्ती ठेवणे, हे पक्षासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपच्या नेत्यांनी कुरैशी आणि काँग्रेसवर टीका केली आहे. ‘यामुळेच सर्वसामान्य मतदार काँग्रेसवर निवडणुकीपुरते हिंदू अशी टीका करतात. कुरैशी यांनी काँग्रेसचा मुखवटा फाडला आहे,’ अशी टीका मध्य प्रदेशातील भाजपच्या नेत्यांनी केली आहे.  

तर, काही काँग्रेस नेत्यांच्या मते, कुरैशी यांचे भाजपशी चांगले संबंध असल्यामुळेच त्यांना सन २०१५मध्ये मिझोरमचे राज्यपाल होण्याची संधी मिळाली होती. आताही त्यांनी मुद्दाम हा मुद्दा काढला आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका जवळ येत असताना ते अशी वादग्रस्त वक्तव्ये करून मुस्लिम मतदारांना काँग्रेसपासून दूर करण्याचा आणि त्यामुळे भाजपला फायदा होईल, असा प्रयत्न करत आहेत, असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Exit mobile version