25 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरराजकारणमहामारीचे संकट दूर करण्यावर लक्ष ठेवा

महामारीचे संकट दूर करण्यावर लक्ष ठेवा

Google News Follow

Related

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा परदेशातील दूतावासांना स्पष्ट संदेश

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एएनआयला विशेष मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी कोविडला सामायिक समस्या (shared problem) आणि जागतिक समस्या म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असे देखील सांगितले की यापूर्वी भारताने जगातील इतर देशांना सहाय्य केले होते आणि आता कोविड भारतात फोफावू लागल्याने जगाकडून भारताल सहाय्य केले जात आहे.

हे ही वाचा:

टाटा उभारणार ४०० ऑक्सिजन प्लांट्स

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात ठाकरे सरकार उताणे

मुंबईतील लसीकरणाला सुरूवात

देशात ऑक्सिजन पुरवण्याचे हर तऱ्हेने प्रयत्न

डॉ. एस जयशंकर यांनी या मुलाखतीत विविध मुद्द्यांना स्पर्ष केला. त्याबरोबरच त्यांनी सांगितले की भारतात असलेली परिस्थीती केवळ एकमेवाद्वितीय आहे. त्यामुळे याची तुलना जगाशी होणे अवघड आहे. त्याबरोबरच त्यांनी हे देखील सांगितले, की मागच्यावेळेस जगाला गरज होती तेव्हा आपण हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, पॅरासिटॅमॉल यांचा पुरवठा केला. आपण ही औषधे अमेरिका, सिंगापूर, युरोपियन युनियन यांना दिली. आता त्याला मदत म्हटलं जात आहे, आम्ही मात्र त्याला मैत्रीचा हात म्हणतो.

याबरोबरच त्यांनी सांगितले, की ही जागतिक समस्या झाली आहे, आणि जगाने यापूर्वी कधीच अशा महामारीचा सामना केला नव्हता. त्यामुळे लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

परराष्ट्र मंत्री राहण्यापूर्वी परराष्ट्र सचिव असलेल्या जयशंकर यांनी भारताच्या नागरिकांना आश्वासन दिले की, ते त्यांच्या क्षमतेत शक्य तेवढे सगळे प्रयत्न भारताला मदत मिळावी यासाठी करणार आहेत. त्याबरोबरच सध्या भारतीय नागरिक कोविडच्या दुसऱ्या लाटेत अतिशय कठिण काळाला तोंड देत असल्याची जाणिव असल्याचे देखील ते म्हणाले. हे माझे कर्तव्य आहे आणि ते पूर्ण करणं हे स्वाभाविक आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

महामारीचे संकट दूर करण्यावर लक्ष ठेवा

या मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले की, परदेशातील दुतावासांना माझा स्पष्ट संदेश आहे. भारतात वादविवाद होत राहतील त्याकडे दुर्लक्ष करा. तुमचं काम आपल्या गरजेच्या वस्तु- ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा सुरळीत पुरवठा होत राहिल याची काळजी घेण्याचे आहे. ते काम करत रहा. सरकार ज्याप्रमाणे महामारीवर आपले लक्ष केंद्रीत करून काम करत आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील करा.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा