दिल्लीत सोमवारपर्यंत पूर्ण लॉकडाऊन

दिल्लीत सोमवारपर्यंत पूर्ण लॉकडाऊन

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती आणखी बिघडलेली असतानाच दिल्लीमध्ये आज रात्रीपासून पुढच्या सोमवारपर्यंत सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भातील माहिती देत खासगी आस्थापनांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिले आहेत.

सोमवारी म्हणजेच आज रात्री १० वाजल्यापासून पुढच्या सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत म्हणजेच (२६ एप्रिलपर्यंत) हा लॉकडाऊन लागू असेल. या नियमांअंतर्गत अत्यावश्यक सेवा, अन्नपुरवठा, वैद्यकिय सेवा सुरुच राहणार आहेत. तर, लग्नसोहळ्यांमध्ये ५० उपस्थितांचा आकडा बंधनकारक असेल, अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली.

पुढील सहा दिवसांमध्ये लॉकडाऊन काळात, दिल्लीमध्ये बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे, असं म्हणत केजरीवाल यांनी आपल्याला केलेल्या सहकार्यासाठी केंद्राचे आभारही मानले. लॉकडाऊनच्या या काळात निर्बंध लागू असताना ऑक्सिजन, औषधं अशा सुविधा मार्गी लावण्यासाठीची पावलं उचलण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय त्यांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं.

हे ही वाचा:

कोरोनाचे ‘जंतू’ फडणवीसांच्या तोंडात ‘कोंबणाऱ्या’ आमदाराविरोधात तक्रार दाखल

ठाकरे सरकारची अकार्यक्षमता झाकण्यासाठी नवाब मलिक यांनी खोटी माहिती दिली

आम्हाला गृहमंत्र्यांना पैसे द्यावे लागतात- पोलीस निरीक्षक

‘या’ सहा राज्यातून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य

रविवारी दिल्लीमध्ये कोविडचे सर्वाधिक म्हणजेच, २५,४६२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या भागात संसर्गाचं प्रमाण वाढीस लागलं असून, त्याची सरासरी २९.७४ वर पोहोचली आहे. याचाच अर्थ असा, की चाचणीचा दर तिसरा नमुना पॉझिटीव्ह असल्याचं आढळून येत आहे. मागील २४ तासांत दिल्लीमध्ये १६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

Exit mobile version