अनिल परबांच्या अडचणीत वाढ, दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

अनिल परबांच्या अडचणीत वाढ, दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात दापोली येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमैय्या आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अनिल परब यांनी दापोली येथे बेकायदेशीर पद्धतीने साई रिसॉर्ट नावाचे एक रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला आहे. त्या संबंधितच ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी सोमैय्या यांनी अनिल परब यांच्यावर रिसॉर्ट घोटाळ्याचे आरोप केले होते. गुहागर येथे एका शेतजमिनीवर परब यांनी अवैधपणे साई रिसॉर्ट बांधले आहे असा दावा सोमैय्या यांनी केला आहे. त्यासंबंधीची काही कागदपत्रेही सोमैय्या यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून प्रसिद्ध केली होती. या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने सोमैय्या यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. या प्रकरणी परब यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली आहे. तसेच परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशीही मागणी सोमैय्या यांनी केली आहे.

हे ही वाचा:

घोषणा सम्राट सरकारमुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा

भेट लागी जिव्हारी

बारा आमदारांचे प्रकरण विचाराधीन, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

याच बेकायदेशीर बांधकामासाठी सोमैय्या यांनी आता दापोली पोलिस स्थानकात अनिल परब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड संहिता कलम ४२०, पर्यावरण संवर्धन अधिनियम कलम १५, तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम ५२, ५३, ५४, ५५, ५६ आणि ५६ (अ) आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४५ अंतर्गत ही तक्रार करण्यात आली आहे.

Exit mobile version