फडणवीसांवरची आक्षेपार्ह टिप्पणी पडली महागात

फडणवीसांवरची आक्षेपार्ह टिप्पणी पडली महागात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह्य वक्तव केल्याबद्दल नाशिकमध्ये पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यात सोशल डिस्टन्सिंगवरून काही विधान केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील गाजत आहे.

दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या बिटको हॉस्पिटलमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना परिस्थिती बाबत आढावा घेतला होता. त्यावेळी काही जणांनी फडणवीसांविषयी आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दौऱ्यात विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकरही त्यांच्यासोबत होते.

हे ही वाचा:

भाजपाचे आवताडे महाविकास आघाडीवर भारी

बेळगावात भाजपा पुढे

नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर

निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ

फडणवीसांच्या हॉस्पिटल दौऱ्यात काही लोकांनी वरच्या मजल्यावरुन एक व्हिडीओ शूट केला. त्यावेळी या भेटी दरम्यानच्या सोशल डिस्टन्सिंगवरून अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी करण्यात आली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

नाशिकमधील झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीत मोठी गळती झाली आणि ऑक्सिजन पुरवठ्या अभावी रुग्णालयातील 22 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर नाशिकमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसच्या मदतीने चार ऑक्सिजन टँकर पुरवण्यात आले.

Exit mobile version