खोट्या बातम्या पसरवणाऱ्या स्वरा भास्कर विरोधात तक्रार दाखल

खोट्या बातम्या पसरवणाऱ्या स्वरा भास्कर विरोधात तक्रार दाखल

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये वृद्धाला झालेल्या मारहाणीचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत आहे. या घटनेशी संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री स्‍वरा भास्‍कर, ट्विटर इंडियाचे मनीष माहेश्वरी यांच्यासह काही जणांनी ट्वीट करत निषेध केला होता. त्यानंतर स्वरा, माहेश्वरी यांच्यासह अन्य ट्विटराईट्सच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वृद्धाला झालेल्या मारहाणी प्रकरणी प्रक्षोभक ट्वीट केल्याचा आरोप स्वरा भास्करवर आहे. वकील अमित आचार्य यांनी दिल्लीतील तिलक मार्ग पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

बुलंदशहरमधील अनूपशहर येथे राहणारे ७२ वर्षीय अब्दुल समद सैफी ५ जूनला आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गाझियाबादला गेले होते. तिथे त्यांनी रिक्षा पकडली. या रिक्षामध्ये चार युवक बसले होते. अब्दुल समद सैफी यांना चौघांनी ‘जय श्रीराम’ बोलण्यास भाग पाडल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांची दाढी कापल्याचाही आरोप आहे. मारहाणीचा व्हिडीओ शूट करताना रिक्षामध्ये गाणं सुरु होतं. त्यामुळे ‘जय श्रीराम’ बोलण्याचा दबाव आणल्याचा आवाज ऐकू येत नाही, असाही दावा आहे.

दुसरीकडे, गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरवर माहिती दिली की अब्दुल समद सैफी हे ताविज बनवत असत, त्यावरुनच ही घटना घडली.

हे ही वाचा :

शिवसेनेच्या अटक झालेल्या नेत्यांचे गॉडफादर कलानगरमध्ये बसलेले आहेत काय?

मराठा, ओबीसींच्या आरक्षणावरून ठाकरे सरकारने मोठं षडयंत्र रचलं

ठाकरे सरकार विरुद्ध नाशिकमध्ये ओबीसी मोर्चा

सीबीएसईचे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर होणार

सैफींच्या कुटुंबीयांनी मात्र पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. आपण या प्रकरणाची तक्रार करण्यसाठी पोलिसात गेलो असताना पोलिसांनी दोन हजार रुपये घेतले आणि परत जाण्यास सांगितलं, असा आरोप सैफींच्या मुलाने केला आहे. पीडित अब्दुल सैफी हे कारपेंटर आहेत, ते ताविज बनवत असल्याचा कुटुंबाने इन्कार केला.

Exit mobile version