शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप

शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राहून शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराची तक्रार दिली आहे. मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात या महिलेने तक्रार दिली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिले आहे.

राहुल शेवाळे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मुंबई पोलीस आणि कायद्यावर विश्वास असून कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे राहुल शेवाळेंनी स्पष्ट केले आहे.

“एका महिलेकडून मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात माझ्या विरोधात लेखी तक्रार करण्यात आली आहे. ही लेखी तक्रार पूर्णतः निराधार आहे. माझी सामाजिक- राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने हा सर्व प्रकार केला आहे,” अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

अफगाणिस्तान स्फोटाने हादरला; नऊ जण ठार

शिवसेना खासदार भावना गवळींना अटक होणार?

महाराष्ट्रात सापडलेल्या तलवारीच्या साठ्यासाठी गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का ?

‘राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक’

“माझा मुंबई पोलीस आणि कायद्यावर पुर्णतः विश्वास असून याबाबत पोलीस आणि न्याययंत्रणा योग्य निर्णय घेतील, असा विश्वास आहे. मी निर्दोष असल्याचं सिध्द करण्यासाठी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. तसेच या तक्रारीमागे असणाऱ्या लोकांचाही पर्दाफाश लवकरच करणार,” असेही राहुल शेवाळे यांनी सांगितले.

Exit mobile version