पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान केल्याने संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल!

भाजप नेत्यांकडून टीकेची झोड

पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान केल्याने संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल!

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आपल्या वादग्रस्त विधानावरून नेहमी चर्चेत असतात.दरम्यान, संजय राऊत यांनी पुन्हा बेताल वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे.संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याची धमकी दिली आहे.संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेऊन छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अहमदनगर येथे एका सभेला संबोधित करताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र जिंकण्यासाठी औरंगजेब २७ वर्ष लढत होता आणि शेवटी औरंगजेबाला महाराष्ट्राने गाडून त्याची कबर खणलेली आहे.तेव्हा पंतप्रधान नरेंद्र तुम्ही कोण आहात, असे संजय राऊत म्हणाले.संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर भाजपने टीका करण्यास सुरुवात केली असून त्यांच्याविरुद्ध विविध ठिकाणी तक्रार दाखल करण्यात येत आहेत.

हे ही वाचा:

हिंदू दहशतवादाचे पितृत्व पवारांचेच, ले.कर्नल पुरोहीतांचा गौप्यस्फोट!

‘दाऊद टोळी ड्रग्सच्या धंद्यात अजूनही सक्रिय’

निवडणुकीसाठीचा प्रचार हा मूलभूत अधिकार नाही, म्हणत केजारीवालांच्या जामीनाला ईडीकडून विरोध

‘मराठा आरक्षणाचा बनाव रचत बापानेच केली मुलाची हत्या’

भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रमोद राठोड यांनी संजय राऊत यांच्या विरुद्ध कुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तसेच निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि प्रदेश सचिव जयंत डेहणकर यांच्या नेतृत्वात भाजपने संजय राऊत यांच्या विरोधात बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी देखील बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version