साकेत गोखले यांच्याविरोधात तक्रार दाखल

साकेत गोखले यांच्याविरोधात तक्रार दाखल

भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय मोर्चा, महाराष्ट्रचे अध्यक्ष संजय पांडे यांनी कोरोना काळात चुकीच्या आणि भिती पसरवणाऱ्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

नेमके काय घडले?

महाराष्ट्रात सध्या रुग्णांसाठी रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दमण-दीव येथून ब्रुक फार्मा या कंपनीकडून रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी भाजपाचे आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड स्वतः दमण-दीव येथे जाऊन, त्या कंपनीच्या डायरेक्टरना भेटले होते. त्यावेळी या कंपनीला देशांतर्गत विक्रीसाठी योग्य ते लायसन्स नसल्याचे त्या कंपनीने सांगितले होते.

हे ही वाचा:

कुडमुड्या गोखले गँगचा गलका

ठाकरे सरकार या प्रश्नांची उत्तरे देणार का?

दिल्लीत सोमवारपर्यंत पूर्ण लॉकडाऊन

महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना या सर्व प्रकरणांची कल्पना दिली होती. मात्र तरीदेखील पोलिसांनी या कंपनीच्या डायरेक्टरला अटक केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले.

मात्र तरीदेखील साकेत गोखले यांनी अत्यंत खोटी आणि बिनबुडाची बातमी देणारे ट्वीट्स करण्याचा खोडसाळपणा केला होता. या ट्वीट्स मधून त्यांनी अत्यंत गंभीर आरोप कोणतेही पुरावे न देता केले होते. त्यामुळे संजय पांडे यांनी साकेत गोखले यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

संजय पांडे यांनी ओशिवारा पोलिस ठाण्यात साकेत गोखले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याबरोबरच चुकीची माहिती पसरवून, सार्वजनिक उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, आणि भय निर्माण करण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्यांखाली कडक कारवाई करण्याची मागमी देखील त्यांनी केली. याबाबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

Exit mobile version