सतत वादाच्या भोवऱ्यात असणारे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. समाजीक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्या विरोधात दोन तक्रारी मध्य प्रदेशात दाखल करण्यात आल्या आहेत. या तक्रारीच्या आधारे कोळसे-पाटील यांच्या विरोधात दोन प्रथम माहिती अहवाल दाखल होण्याची शक्यता आहे.
“२०१८ साली झालेल्या एल्गार परिषदेत भडकाऊ भाषण देऊन सामाजिक वातावरण दूषित केले होते,या वर्षीही ३० जानेवारी रोजी पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या माध्यमातून देशभरात दंगली भडकवण्याचे षडयंत्र कोळसे पाटील रचत आहेत. तेव्हा त्यांना तातडीने अटक करून याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा.” असे या तक्रारीत म्हंटले आहे. संदर्भासाठी कोळसे-पाटील यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या गौरव गोहाड आणि श्रीकांत शर्मा या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली आहे.
#BREAKING Activists @Gaurav_gohad n Shrikant Sharma from #MadhyaPradesh lodged police complaint against fake judge @KolsePatilBG for latest #ElgarParishad2021 vitiating communal atmosphere. @CMMadhyaPradesh @MPDial100 likely 2 register 2 FIR in 2 complaints @drnarottammisra pic.twitter.com/SboxV6qbKK
— Legal Rights Observatory- LRO (@LegalLro) January 30, 2021
महाराष्ट्रात पुन्हा एकदा एल्गार परिषदेचे आयोजित करण्यात आले आहे. ३० जानेवारी रोजी पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात ही परिषद होणार आहे. या आधी झालेली एल्गार परिषद वादग्रस्त भाषणांमुळे चांगलीच चर्चेत राहिली होती.