राणा यांच्या फोटोसंदर्भात अनोळखी इसमाविरुद्ध तक्रार

राणा यांच्या फोटोसंदर्भात अनोळखी इसमाविरुद्ध तक्रार

लिलावती रुग्णालयात खासदार नवनीत राणा यांच्या करण्यात आलेल्या एमआरआय स्कॅनिंगनंतर काढल्या गेलेल्या फोटोविरोधात एका अज्ञात इसमाविरुद्ध वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे.

या रुग्णालयात सिक्युरिटी सुपरवायझर असलेल्या अमित गौड यांनी ही तक्रार केली असून त्यात पांढऱ्या शर्टमधील एका अनोळखी व्यक्तीने राणा यांचे फोटो त्यांना एमआरआय स्कॅनिंगसाठी नेण्यात आलेले असताना काढल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

गौड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ६ मे रोजी नवनीत राणा या लिलावतीमध्ये पाठदुखी व मानदुखीसाठी दाखल झाल्या. त्यांच्यावर इतरही वैद्यकीय तपासण्या सुरू होत्या. ६ व ७ मे रोजी त्यांना एमआरआय व इतर चाचण्या करण्यास सांगण्यात आले होते. ६ मे रोजी रात्री १० वाजता नवनीत राणा, त्यांचे पती रवी राणा, त्याचा सुरक्षा रक्षक व एक पांढरा शर्ट घातलेला एक अनोळखी इसम असे सगळे रेडिओलॉजी डिपार्टमेंडमधील एमआरआय विभागात गेले.

या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, या अनोळखी इसमाने कोणतीही परवानगी न घेता राणा यांचे एमआरआय मशिनच्या ट्रॉलीवरील फोटो काढले. ते प्रसारमाध्यमांना दिले आणि सोशल मीडियावरही टाकले. हॉस्पिटलच्या नियमानुसार एमआरआय मशिनजवळ धातूच्या व इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई आहे. या नियमांचा भंग या इसमाने केला. त्याने परवानगी न घेता फोटो काढल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करावी. हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा गुन्हा चित्रित झाला आहे त्याचे चित्रण पोलिसांना सादर करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

इलेक्ट्रिक स्कूटर करा स्वागत, थोडं सावध!

‘राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला’

कर्नाटकात मशिदीवर फडकला भगवा

राज्य सरकारचे वेळकाढू धोरण ओबीसी समाजासाठी घातक ठरते आहे

 

नवनीत राणा यांच्या फोटोवरून बरेच रणकंदन माजले असून शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर व आमदार मनिषा कायंदे यांनी रुग्णालयात जाऊन कर्मचारी व डॉक्टर यांना जाब विचारला. मीडियाला गोळा करून त्यांच्यासमोरच त्यांनी मीडिया ट्रायल घेतली.

 

Exit mobile version