उद्धव ठाकरेंविरोधात कानपूरमध्ये तक्रार; वाचा सविस्तर…

उद्धव ठाकरेंविरोधात कानपूरमध्ये तक्रार; वाचा सविस्तर…

कानपूर शहराच्या महापौर प्रमिला पांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करत स्वरूप नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार नॉन-कॉग्निझिबल रिपोर्ट (एनसीआर) म्हणून नोंदवली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या विधानानंतर आता योगी यांच्यावरील अपमानास्पद भाषेची खूप चर्चा होऊ लागलेली हे. ठाकरे यांनी योगी यांच्याबद्दल केलेले अपमानास्पद विधान हे आता चांगलेच व्हायरल झालेले आहे. कानपूर पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीसह सादर करण्यात आलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये ठाकरे हे योगींना चप्पल मारतील असे ऐकायला मिळत आहे. पांडे यांनी कानपूरच्या स्वरूप नगर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीबद्दल माध्यमांशी बोलताना महापौर पांडे म्हणाल्या की, ठाकरे जर उत्तर प्रदेशात आले तर मग आम्ही बरोबर कोण कोणाला चप्पल मारणार हे बघून घेऊ.

हे ही वाचा:

संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालत आहेत!

जन धनधनाधन; योजनेचा लाखो कुटुंबियांना लाभ

तालिबान पाकिस्तानवरच उलटेल

यंदा विमान तिकीट आरक्षणाची गगनाला गवसणी!

उद्धव ठाकरे यांनी आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती आणि मी त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार केली आहे, अशी माहिती पांडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. अधिक बोलताना त्या म्हणाल्या, “पुढच्या वेळी जेव्हा ते उत्तर प्रदेशात येईल, तेव्हा मी त्यांना सांगेन की चप्पलचा वापर एखाद्याला मारण्यासाठी कसा केला जातो. मी त्यांना चप्पलने मारणार नाही, कारण माझा पक्ष अनुशासनाच्या अशा कृत्यांना मान्यता देत नाही.” अधिक बोलताना त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री केवळ आपल्या वडिलांच्या वारशाचा आनंद घेत आहेत. स्वरूप नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अश्विनी पांडे यांनी सांगितले की, तक्रार एनसीआर म्हणून नोंदवण्यात आली आहे.

Exit mobile version