आक्षेपार्ह विधानाविरोधात संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा

संजय राऊत मात्र २ हजार कोटीचे डील झाल्याच्या विधानावर ठाम

आक्षेपार्ह विधानाविरोधात संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा

बेलगाम बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले खासदार संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या भाषणानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्याविरोधात नाशिकमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.

शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे श्रद्धास्थान आहेत. संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य आमच्या भावना दुखावणारे आहे. संजय राऊत यांना कोणतेही प्रत्युत्तर द्यायचे नाही, असे आमच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ठरविले आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच असे वक्तव्य ते करत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. संजय राऊत यांनी याबाबत माफी मागितली पाहिजे. नाहीतर त्यांना नाशिकमध्ये फिरकू देणार नाही.

हे ही वाचा:

बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!

११व्या मुलाच्या जन्मानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले…

रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…

मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चाटले

बेलदार म्हणाले की, संजय राऊत हे शरद पवार यांचे शिवसैनिक आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैंनिक आहोत.

यासंदर्भात पुन्हा एकदा संजय राऊत यांनी मात्र चिन्ह आणि नावासाठी २ हजार कोटींचा सौदा झाल्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, असे डील झाले आहे हे मी काल म्हणालो आजही म्हणतो आहे. भारतीय जनता पक्षाचे लोक किंवा शिंदे गटाचे लोक यापूर्वीपासूनच आमच्याच बाजूने निकाल लागेल असे म्हणत होते. एक नेता तर ब्रेकिंग न्यूज सांगत होता, देवेंद्र फडणवीसही खात्रीशीर म्हणत होते, यावरून असे डील झाल्याचेच दिसते.

Exit mobile version