सोमय्या सहकुटुंब पोलिस ठाण्यात; संजय राऊतांविरोधात तक्रार

सोमय्या सहकुटुंब पोलिस ठाण्यात; संजय राऊतांविरोधात तक्रार

सोमवारी, ९ मे रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना चारित्र्यहनन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ५०३, ५०६ आणि ५०९ अंतर्गत पोलिसांनी एफआयआर दाखल करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. मिरा-भाईंदरमध्ये शौचालय घोटाळ्यात राऊत यांनी मेधा सोमय्यांवर आरोप केले होते.

संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांत घोटाळा केल्याचा कथित आरोप केला होता. तसेच सोमय्यांच्या पत्नीवर देखील संजय राऊत यांनी आरोप केले होते. याप्रकरणात माफी मागण्यासाठी सोमय्यांनी संजय राऊतांना अल्टिमेटम दिले होते. मात्र राऊतांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने सोमय्यानी त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुलूंडच्या पोलीस ठाण्यात सोमय्या कुटुंबीयांसह जाऊन राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मिरा-भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली होती. त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना मिळाले होते.मात्र, बनावट कागदपत्रे सादर करून, पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप मेधा यांच्यावर करण्यात आला होता.

हे ही वाचा:

मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी मोजा इतके रुपये

NIA कडून डी कंपनीसंबंधित २० ठिकाणी छापे

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

नांदेडमधून १० तलवारी जप्त; एकाला अटक

मात्र सोमय्या यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आज सोमय्यांनी कुटुंबासह मुलुंड पोलीस ठाण्यात राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version