व्होट जिहादसाठी आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानी यांच्याविरोधात तक्रार

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली तक्रार दाखल

व्होट जिहादसाठी आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानी यांच्याविरोधात तक्रार

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केलं. या व्हिडीओ नंतर महायुतीकडून व्होट जिहादचा आरोप करण्यात येत असून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या व्हिडीओवरून विरोधकांना लक्ष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील खडकवासला येथे सभा पार पडली. यावेळी फडणवीस यांनी सज्जाद नोमानी यांची क्लिप सर्वांना ऐकवली.

या क्लिपमध्ये नोमानी म्हणाले की, “मी हे निश्चित सांगू शकतो की, महाराष्ट्राच्या निवडणुकीला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जर इथे हरियाणाप्रमाणेच त्यांचा (भाजपा) विजय झाला तर त्यांचा आत्मविश्वास आणखी मजबूत होईल. त्यानंतर दिल्ली सरकार नव्या आत्मविश्वासाने आपल्या वाईट हेतूंच्या दिशेने मार्गक्रमण करेल. जर महाराष्ट्रात त्यांचा (भाजपाचा) पराभव झाला, दिल्लीमधले त्यांचे सरकार अधिक काळ टीकू शकणार नाही. त्यामुळे आपल्या निशाण्यावर फक्त महाराष्ट्राचे सरकार नाही, तर दिल्लीही आहे.” शिवाय त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची नावेही घेतली आहेत. त्यामुळे हे व्होट जिहाद असल्याचा आरोप महायुतीकडून होत आहे.

हे ही वाचा : 

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल बंद! रवींद्र वायकरांना दिलासा

झाशीमध्ये अग्नितांडव; रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू

अहो, आश्चर्यम्… विळा-भोपळा एकत्र आला; एका सुरात बोलले जरांगे-मुंडे

पंतप्रधान मोदी भाजपाच्या १ लाख बूथ प्रमुखांशी साधणार संवाद!

दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुस्लिमांचा धार्मिक भावना भडकवणे, द्वेषयुक्त भाषण करणे, ज्या मुसलमानाने भाजपचे समर्थन केले त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करणे, वोट जिहाद आवाहन करणे अशा तक्रारी केल्या आहेत.

Exit mobile version