महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत वेगळे झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर ५० खोक्याचे आरोप केले. त्यानंतर अशा पद्धतीची टिप्पणी प्रत्येकजण करू लागला.
आता छत्रपती संभाजीनगरच्या एका रॅपरने याच धर्तीवर एक गाणे बनविले होते त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली असून या रॅपरचे नाव राज मुंगासे असे आहे.
हे ही वाचा:
फडतूस नही काडतूस हूँ, झुकेगा नही, घुसेगा!!
भेगा असल्या तरी गेटवे ऑफ इंडिया सुस्थितीत
केरळ गाडी जाळपोळ प्रकरणातील आरोपीला रत्नागिरीत घातल्या बेड्या
१२ लाख डॉलर दंड भरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुटले!
चोर आले, चोर आले एकदम ओके होऊन, पन्नास खोके घेऊन, किती चोर आले. असे शब्द असलेले हे गाणे त्याने बनवले असून त्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्यावर त्या गाण्यातून टीका करण्यात आली आहे. पण त्यात वापरण्यात आलेले शब्द हे अत्यंत खालच्या भाषेतील आहेत. त्यामुळे राज मुंगासे याला अटक होण्याची शक्यता आहे.
त्याने ज्या गाण्यातून अपशब्दांचा वापर केला आहे, ते शब्द असे आहेत- चोर आले. चोर आले… चोर आले.. एकदम ओके होऊन, कसे बघा चोर आले. पन्नास खोके घेऊन किती चोर आले. एकदम ओके होऊन. अरे छक्क्यांच्या मिशीला ताव बघा, हयांनी पाठीवर दिला आपल्या घाव बघा. गेले सुरत गुवाहट्टी अन् गोवा कसे ढोसली दारू, अन म्हणला हा डाव बघा, अरे पळकुटे चोर झाले, छातीमध्ये छप्पन चोरलास छप्पन चोरलास पक्ष हयांनी चोरतील बाप पण आळया पडुन पडतील हा महाराष्ट्राचा श्राप आहे. मराठी माणुस हा संगळ्यांचा बाप आहे. चोर आले पन्नास खोके घेऊन किती बघा चोर आले. एकदम ओक होऊन कसे बघा चर आले. आपले प्रकल्प पळवतो गुजरातला हया साल्यांनी, महाराष्ट्र विकला या भडव्या दलालांनी सत्तेसाठी हे झुकले, हे दिलीला जाऊन शिवरायांचे वाघ आईघाल्यांनी जाळु यांची लंका, दाऊ यांना इंगा.. भोगा कर्माची फळे..
हे गाणे सोशल मीडियावर चर्चेत असून या गाण्यातील शब्द हे शिंदे गटावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करणारे आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने या रॅप गाण्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
सध्या ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्तीला मारहाण केल्याच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांना ठाकरे गटाकडून लक्ष्य करण्यात आले आहे.