30 C
Mumbai
Friday, July 5, 2024
घरक्राईमनामाखोट्या बातम्यांमुळे मिड-डे, राजदीप सरदेसाई, ध्रुव राठीविरुद्ध तक्रार

खोट्या बातम्यांमुळे मिड-डे, राजदीप सरदेसाई, ध्रुव राठीविरुद्ध तक्रार

फोनवर ओटीपी वापरून ईव्हीएम अनलॉक केल्याची प्रसिद्ध केली होती बातमी

Google News Follow

Related

शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या एका नातेवाइकाने त्यांचा मोबाइल फोन वापरून ईव्हीएमशी कनेक्ट केल्याचे खळबळजनक वृत्त मिड-डेने प्रकाशित केल्यानंतर काही दिवसांनी, ही प्रकाशन संस्था आणि या आरोपाची री ओढणाऱ्या इतरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऍड. विवेकानंद दयानंद गुप्ता यांनी ‘एक्स’वर माहिती देऊन, त्यांनी मुंबईतील महादंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करून बनावट बातम्यांसाठी वृत्तपत्र आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी केली आहे.

मिड-डेचे रिपोर्टर शिरीष वकतानिया यांनी खोटे दावे केल्याचे वकिलाने नमूद केले आहे. तसेच, या दाव्याची री ओढणारे इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार प्रियांका चतुर्वेदी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत, आप समर्थक यूट्यूबर ध्रुव राठी, काँग्रेस नेते सरल पटेल आदींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

भारतीय दंड संहितेच्या कलम १६५ (३) अंतर्गत पोलिसांना या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३४आणि १२०ब सह कलम ५०५ (२) अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी याचिकेत मागणी आहे.

शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पांडिलकर हे ४ जून रोजी मतमोजणीच्या वेळी मोबाइल फोनचा वापर करून ओटीपी तयार करून ईव्हीएम अनलॉक करू शकले, असे खोटे वृत्त १६ जून रोजी मिड-डेने प्रसिद्ध केले होते. वायकर सुरुवातीला पिछाडीवर असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला होता, परंतु दुसऱ्या एका व्यक्तीने दिनेश गुरव यांनी त्याच फोनचा वापर करून ओटीपी जनरेट करून इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम अनलॉक केल्यानंतर, शिवसेनेच्या खासदाराने आघाडी करण्यास सुरुवात केली आणि अखेरीस कमी फरकाने निवडणूक जिंकली, असा दावा या वृत्तात करण्यात आला होता.

ईव्हीएम प्रत्यक्षरीत्या सील केलेले असल्याने मोबाइल फोन वापरून ईव्हीएम अनलॉक केले जाऊ शकत नाहीत. शिवाय, इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमचा दावाही खोटा होता कारण पोस्टल मतपत्रिका या कागदी मतपत्रिका असतात आणि पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी प्रक्रियेच्या सुरुवातीला मोजणी केली जाते. बनावट अहवाल ताबडतोब मोठ्या संख्येने भाजपविरोधी आघाडीच्या लोकांनी सामायिक केला होता. ज्यांनी अधिक सुरक्षित आणि छेडछाडप्रूफ ईव्हीएमच्या जागी मतपत्रिका परत करण्यासही समर्थन दिले. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका चतुर्वेदी, आदित्य ठाकरे, राजदीप सरदेसाई, सुप्रिया श्रीनाटे, ध्रुव राठी, प्रशांत भूषण आदींचा समावेश होता.

हे ही वाचा:

मुसळधार पावसामुळे दिल्ली जलमय; दिल्लीत चार मुलांसह सहा जण बुडाले

रेल्वे पोलिसांनी अंधेरी स्थानकात गर्दुल्याच्या मुसक्या आवळल्या!

राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजाना’ सुरु करणार

अयोध्येत पाणी तुंबले, खड्डे पडले; योगींकडून अधिकारी निलंबित

नंतर निवडणूक आयोगाने मिड-डेच्या दाव्याचे खंडन केले आणि स्पष्ट केले की फोनच्या अनधिकृत प्रवेशासाठी दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. केवळ फोन असल्यामुळे त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आणि एफआयआरमध्ये कोणतीही ईव्हीएम किंवा पोस्टल बॅलेट सिस्टम अनलॉक करण्याबद्दल काहीही नमूद केलेले नाही. ईसीआयने मिड-डे वृत्तपत्राला ईव्हीएमबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल आणि भारतीय निवडणूक व्यवस्थेमध्ये शंका निर्माण केल्याबद्दल नोटीस बजावली होती.

त्यानंतर, मिड-डेने आपल्या वेबसाइटवरून ही बातमी काढून टाकली आणि आरोपी व्यक्तीने ईव्हीएम अनलॉक करण्यासाठी ओटीपी तयार करण्यासाठी त्याचा मोबाइल फोन वापरला, हे वृत्तात अनवधानाने चुकीने नमूद केल्याचा खुलासा प्रकाशित केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा