राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’, अशी स्थिती निर्माण झाल्याचा घणाघाती आरोप भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सोमय्यांना रोखण्याचे आदेश या पार्श्वभूमीवर भाजपा आता चांगलीच आक्रमक झाली आहे.
आमदार श्री. आशीष शेलार यांची पत्रकार परिषद. https://t.co/wtrPnvGVOL
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 20, 2021
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यानंतर सोमय्या कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात होते. त्यावेळी सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप भाजपनं केलाय. राज्य अराजकतेकडे जात आहे. पत्रकार, संपाद, जाणकार, बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोललं पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करुच, पण आता सर्वसामान्य नागरिकांनी बोलणं गरजेचं असल्याचं शेलार म्हणाले.
हे ही वाचा:
रश्मी ठाकरे यांच्या नावाने अलिबागमध्ये १९ बंगल्यांचा घोटाळा
गडहिंग्लजसाखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी १०० कोटींचा घोटाळा केला
किरीट सोमय्या यांनी आधीच सांगितलं की अमूक एका ठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी जाणार आहे. त्यावेळी काल मुंबईत शंभर सव्वाशे पोलीस नीलम नगरला घेराव घावून होते. हा पोलिसांचा गैरवापर नाही का? असा सवालही शेलारांनी केलाय. नोटीस म्हणून जी दाखवली जात होती, ती चुकीची आणि बोगस होती. इतकी गंभीर गोष्ट आहे की एका नागरिकाला, एका नेत्याला, एका माजी खासदाराला खोटी आणि बोगस नोटीस दाखवली जाते. ज्या जिल्ह्यातून ही नोटीस काढली असं सांगितलं जातं त्या पोलिसांनी मुंबईतील लोकल पोलिसांकडे एन्ट्री केली होती का? सोमय्यांना नोटीस दाखवण्याची पद्धत आणि खऱ्या नोटीसला उशीर का झाला? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी यावेळी केली.