नवाब मलिकांविरोधात महिला आयोगातही तक्रार

नवाब मलिकांविरोधात महिला आयोगातही तक्रार

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन वानखेडेने महिला आयोगात तक्रार केली आहे. तक्रार करताना त्यांनी लिहिले आहे की, यापूर्वीच दाखल करण्यात आलेल्या एफआयआर प्रमाणे मलिक यांच्यावर कलम ३५४-डी,४९९,५०३,५०८ अंतर्गत तक्रार करण्यात आली आहे. त्याचबरोबर ऍट्रॉसिटीची तक्रारही दाखल केली आहे.

यापूर्वी यास्मिन आणि समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या कुटुंबातील महिलांविरुद्ध अनेक आरोप आणि अश्लील टिप्पण्या केल्या जात आहेत असे सांगितले होते. त्यांच्यावर समाजमाध्यम आणि फोनच्या माध्यमातून अनेक प्रकारचे आरोप आणि धमक्या दिल्या जात आहेत. त्यांनी सांगितलं की आम्हाला उघड-उघड अनेक धमक्या दिल्या जात आहेत. आमच्या कुटुंबातील महिलांवर आणि इतर सदस्यांवर अश्लील आरोप केले जात आहेत.

वानखेडे यांनी मुंबई न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की त्यांच्याविरोधात केलेले बदनामीकारक आरोप केवळ खोटेच नाही तर दिशाभूल करणारे, खोडसाळ आणि अपमानजनक आहेत असे सांगितले होते.

हे ही वाचा:

चीनच्या नव्या सीमा कायद्यावर भारत नाराज

नीरज चोप्रासह या ११ जणांना मिळणार खेलरत्न पुरस्कार

आर्यन खान आजची रात्रही तुरुंगातच काढणार

नवाब मलिक यांचा तातडीने राजीनामा घ्या

“काही (नेत्यांना) निष्पक्ष आणि प्रामाणिक तपास व्हायला नको असल्यामुळे माझ्यावर कारवाई करून मला अटक करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून माझं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं मी करेन. न्यायालयाने कृपया निष्पक्ष आणि प्रामाणिक चौकशी टिकून राहावी याबाजूने निकाल द्यावा.” असं वानखेडेंनी केलेल्या याचिकेत म्हटले होते.

Exit mobile version