भारताच्या लोकशाहीची तुलना गडाफी, सद्दामशी करणे हा भारतीयांचा अपमान

भारताच्या लोकशाहीची तुलना गडाफी, सद्दामशी करणे हा भारतीयांचा अपमान

राहूल गांधी यांच्या भारतातील लोकशाहीवरील भाष्यावर प्रत्युत्तर देताना केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा ८० कोटी भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या विधानात भारतीय लोकशाहीला गडाफीच्या नेतृत्त्वाखालील लिबिया आणि सद्दाम हुसैन यांच्या इराकशी केली आहे.

स्विडनच्या एका संस्थेने प्रकाशित केलेल्या एका अहवालाच्या आधारे ब्राऊन युनिव्हसिटीच्या प्रो. आशुतोष वार्शने यांच्याशी संवाद साधताना राहूल गांधी यांनी भारत आता लोकशाही देश नसल्याचे म्हटले होते. यावेळी ते म्हणाले की, “सद्दाम हुसैन आणि कर्नल गडाफी यांच्या काळातसुद्धा निवडणुका होत होत्या. ते या निवडणुका जिंकत होते.”

हे ही वाचा:

कोण आहेत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे?

परमबीर सिंह यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना अटक करा – अतुल भातखळकर

ममतांचे दुखापतीनंतरचे अजब विधान, हिंदू देवतांबद्दल काय बोलल्या?…

“निवडणुका म्हणजे केवळ जाऊन बटन दाबणे नसते. निवडणुक हा विचार असतो. निवडणुका म्हणजे, संसदेत वादविवाद होत आहेत, न्यायव्यवस्था निष्पक्ष आहे याचे द्योतक आहे. त्यामुळे मत देताना या सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा.”

याला प्रत्युत्तर देताना प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत, की राहुल गांधी यांची वक्तव्ये फारशी मनावर घेण्या योग्य नाहीत “गडाफी आणि सद्दाम हुसैन यांच्याशी तुलना करणे हा ८० कोटी भारतीयांचा अपमान आहे. आणिबाणीच्या काळातच भारत गडाफी आणि सद्दामसारखी परिस्थिती पाहिली होती.”

राहूल गांधी यांनी नेहरू- गांधी घराण्याचे कॉंग्रेसमधील वर्चस्वाचे देखील समर्थन केले होते. त्यांनी हे देखील सांगितले की ते एका विशिष्ट विचारधारेचे संरक्षण करत आहेत आणि कोणाला तरी ते आवडत नाही, म्हणून ते ही गोष्ट सोडणार नाहीत. यावेळी त्यांनी संघाची तुलना मुस्लिम ब्रदरहुडसोबत केली.

Exit mobile version