निलंबित कम्युनिस्ट खासदाराला स्वातंत्र्यवीर सावरकर द्वेषाची उबळ

निलंबित कम्युनिस्ट खासदाराला स्वातंत्र्यवीर सावरकर द्वेषाची उबळ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रती द्वेषाची उबळ  पुन्हा एकदा आली आहे. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी त्यांना माफी मागण्यास सांगितली. पण त्यावर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे खासदार बिनोय विश्वम यांनी आम्ही माफी मागणार नाही. कशाची माफी मागायची? माफी मागायला आम्ही सावरकर नाही, असे वक्तव्य केले. विश्वम यांच्या या वक्तव्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला.

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदी यांनी मात्र या वक्तव्यापासून स्वतःला दूर ठेवले आहे. पण त्यांनी या वक्तव्याला विरोधही केलेला नाही. अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदी हे या १२ निलंबित खासदारांमध्ये समाविष्ट आहेत.

शेतीविषयक कायदे मागे घेण्यासाठी विधेयक सादर केल्यानंतर चर्चेची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गोंधळ घातला. त्यानंतर सभापती वेंकय्या नायडू यांनी अशा गोंधळी १२ खासदारांना निलंबित केले. त्यानंतर आठ विरोधी पक्षांच्या नेत्यांसह मल्लिकार्जुन खरगे यांनी नायडू यांची भेट घेऊन निलंबन उठविण्याची मागणी केली. पण नायडू यांनी निलंबन मागे घेण्यास नकार दिला. सभागृहाचे कामकाज जोपर्यंत योग्य पद्धतीने सुरू ठेवले जात नाही, तोपर्यंत निलंबन मागे घेतले जाणार नाही, असे नायडू यांनी म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवाय, ज्या खासदारांना निलंबित केले आहे, त्यांनी माफी मागणेही आवश्यक आहे.

हे ही वाचा:

चन्नी-सिद्धू वादात आता चन्नी आक्रमक भूमिकेत

बारामतीत ‘शून्य’ स्वच्छता

आसाम, पश्चिम बंगालमधील लोकसंख्येचे बदल ही चिंतेची बाब

मुंबईत पावसाची हजेरी!

 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही कसली माफी? लोकांचे विषय सभागृहात मागितल्याबद्दल माफी मागायची का? असा सवाल ट्विटद्वारे उपस्थित केला. राहुल गांधी यांनीही अनेकवेळा द्वेषभावनेतून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला आहे.

या निलंबित खासदारांमध्ये ६ काँग्रेसचे खासदार असून प्रत्येकी २ तृणमूल व शिवसेनेचे आहेत. तर सीपीआय (एम) आणि सीपीआयचे प्रत्येकी एक खासदार यात समाविष्ट आहेत.

 

Exit mobile version