केजरीवाल यांच्या गळ्याभोवती नवा फास आवळू लागला!

दिल्ली पोलिसांचे अधिकारीही पोहचले मालीवाल यांच्या घरी

केजरीवाल यांच्या गळ्याभोवती नवा फास आवळू लागला!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए विभव कुमार यांनी आप खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. अशातच आता दिल्ली पोलिसांचे अधिकारी गुरुवार, १६ मे रोजी स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे अतिरिक्त सीपी आणि उत्तर जिल्ह्याचे अतिरिक्त डीसीपी स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले. तर दुसरीकडे राष्ट्रीय महिला आयोगानेही आक्रमक भूमिका घेत विभव यांना समन्स धाडले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी खाजगी सचिव विभव कुमार यांना स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी समन्स बजावले आहे. महिला आयोगाने विभव कुमार यांना शुक्रवार, १७ मे रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी सांगितले की, “आम आदमी पक्षाच्या राज्यसभा सदस्य स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणी आवाज उठवला पाहिजे.”

यापूर्वी स्वाती मालीवाल सोमवारी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात पोहचल्या होत्या. यावेळी त्यांनी आरोप केला होता की, अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांना मारहाण केली. मात्र, त्यांनी याप्रकरणी औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. तक्रार नंतर करणार असे त्यांनी सांगितले होते.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला, २ दहशतवादी ठार!

लालूप्रसाद, अब्दुल्ला मोदींच्या पत्नी-मुलांवरून टीका करण्यापर्यंत घसरले!

बरेलीची फरजाना बनली पल्लवी; मुरादाबादची नर्गिस बनली मानसी!

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा फुटबॉलला अलविदा!

त्यानंतर आपचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन मालीवाल यांच्यासोबत घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह असल्याचे सांगितले. शिवाय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून लवकरच कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अशातच लखनऊमध्ये केजरीवाल आणि संजय सिंह यांच्यासोबत विभवचा फोटो समोर आल्याने खळबळ उडाली. भाजपाने हा मुद्दा उचलून धरत टीका केली.

Exit mobile version