सचिन वाझेच्या अटकेमुळे फसले धनंजय गावडेचे गणित

सचिन वाझेच्या अटकेमुळे फसले धनंजय गावडेचे गणित

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निलंबीत पोलिस अधिकाी सचिन वाझे पूरा अडकत चालला आहे. वाझे सध्या एनआयएच्या अटकेत असून रोज वाझे विरोधात नवनवीन पुरावे समोर येत आहेत. पण वाझे हा स्वतः सोबतच इतर अनेकांना घेऊन डुबण्याची चिन्ह आहेत. वाझेचा जुना साथिदार विनायक शिंदे ह्याला मनसुख प्रकरणात अटक झाली आहे. तर वाझे गृहमंत्र्यांसाठी खंडणी गोळा करायचा या आरोपामुळे गृहमंत्र्यांवर टांगती तलवार आहे. अशातच वाझे याच्या अटकेमुळे कुख्यात धनंजय गावडेचेही ‘कमबॅक’ चे मनसुबे धुळीस मिळाल्याची चिन्ह आहेत.

धनंजय गावडे हा शिवसेनेचा नालासोपाऱ्यातील माजी नगरसेवक आणि सभागृहातील गटनेता. गावडे हा २०१५ साली शिवसेनेच्या तिकीटावर वसई-विरार महापालिकेत निवडून आला होता. पण २०१६ साली गावडेवर आयकर विभागाने छापे मारले. त्यावेळी त्याच्याकडून एक कोटी रूपये जप्त करण्यात आले होते. या सोबतच गावडे विरोधात खंडणी,फसवणूक, बलात्कार असे निरनिराळे दहा गुन्हे दाखल आहेत. खंडणीच्या एका गुन्ह्यात वाझे आणि गावडे हे एकत्रितपणे आरोपी आहेत. २०१७ साली शिवसेनेतून त्याची तोंडदेखली हकालपट्टी करण्यात आली. पण कोविडचे कारण पुढे करत वाझे याचे पोलिससेवेत पुनरागमन झाल्यानंतर गावडेला त्याच्या पुनरागमनाचे वेध लागले होते. यादृष्टीने त्याला राज्य सरकारकडून संकेतही मिळाला होता. कारण राज्य सरकारने त्याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात बाजूच मांडली नव्हती. त्यामुळे वाझे पाठोपाठ आता आपलेही पुनर्वसन होणार याची खात्रीच गावडेला पटली होती. त्याला इतकी घाई झाली होती की वसई-विरार पट्ट्यात गावडेच्या फोटोसहित ‘मी परत येतोय’ असे बॅनर लागले होते.

हे ही वाचा:

उद्योजक आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंना फटकारले

संजय राऊतांवर ट्वीट करून शरद पवारांना आवाहन करण्याची वेळ

मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मालवणीत झाली रंगांची उधळण

वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

धनंजय गावडेचे पुन्हा येणे हे एक प्रकारे शिवसेनेला राजकीय फायद्याचे असल्याचे म्हटले जात होते. कारण वसई-विरार पट्ट्यात भाई ठाकूर आणि त्यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाचा एक हाती दबदबा आहे. त्यांच्या राजकीय साम्राज्याला राजकीय धक्का देण्याची क्षमता धनंजय गावडेसारख्या ‘बाहुबली’ कडे आहे. गावडेने ते या आधी सिद्धही केले आहे. या वर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणूका आहेत. या पार्श्वभूमीवर वसई-विरार पट्ट्यात शिवसेनेला आपले अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने गावडे महत्वाचा असल्याची चर्चा आहे.

पण देवेंद्र फडणवीस यांनी मृत्युच्या आधी मनसुख हिरेन धनंजय गावडेला भेटल्याचा गंभीर आरोप केल्यामुळे आणि या प्रकरणात गावडेचा जुना सहकारी सचिन वाझे अडकल्यामुळे गावडेच्या पुनरागमनाचे मनसुबे उधळले जाणार असल्याचे दिसत आहे. आता मनसुख हत्या प्रकरणात गावडेला अटक होणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Exit mobile version