मुंबई लोकल बंद पण महाविद्यालये सुरु?

मुंबई लोकल बंद पण महाविद्यालये सुरु?

मुंबईत १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाविद्यालये ५०% क्षमतेवर सुरु होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नियमित वर्ग आणि परीक्षा या ऑनलाईन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारे घेण्यात येतील. त्याचबरोबर महाविद्यालयात जाणे हे सक्तीचे नसून ऐच्छिक विषय असेल. अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

मुंबईत मार्च २०२० पासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला होता. तेंव्हापासूनच शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवली होती. मुंबईत अनेक महिने देशातील सर्वाधिक कोविड केसेस असल्यामुळे मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये बंदच होती. आता कोविडच्या केसेस कमी झाल्यावर महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे. १५ फेब्रुवारी ही तारीख आता महाविद्यालये ५०% क्षमतेवर सुरु करण्यासाठी निश्चित केली असली, शाळा सुरु करण्याबद्दल अजून कोणतीही माहिती सरकारने दिलेली नाही.

महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण हे लोकलचा प्रवास करतात. मुंबईत १ फेब्रुवारी पासूनच आम जनतेसाठी लोकलसेवा सुरु करण्यात आलेली आहे. परंतु लोकलसेवा सुरु झाली असली तरी त्याच्या वेळा या लोकांच्या सोयीच्या नाहीत. सध्या मुंबई लोकल ही केवळ रात्री नऊ ते सकाळी सात या वेळात आणि दुपारी बारा ते चार या वेळातच आम जनतेसाठी खुली असल्याने, महाविद्यालयांची वेळ याला कशी जुळणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

Exit mobile version