शिवसेनेचे सभासद कार्ड, पैसे उकळले मनसेच्या नावाने?

शिवसेनेचे सभासद कार्ड, पैसे उकळले मनसेच्या नावाने?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नावाने बनावट पावती बुक बनवून फेरीवाल्यांकडून पैसे उकळणाऱ्या दोन भामट्यांना रंगेहात पकडल्याची घटना विरार येथून समोर आली आहे. या दोन भामट्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलेल्या भामट्यांकडे शिवसेनेचे सभासद नोंदणी कार्ड आढळून आले आहे. या घटनेमुळे विरारमध्ये आता मनसे आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी भामट्यांना समज देऊन सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे.

चार दिवसांपूर्वी विरार पूर्व मनवेलपाडा, कारगील नगर परिसरात दोन भामटे मनसेच्या नावाने शिव जयंतीची वर्गणी गोळी करत असल्याचे मनसेचे पदाधिकारी प्रफुल्ल जाधव यांना समजले. त्यावेळी प्रफुल्ल जाधव यांनी परिसर गाठला. घटनास्थळी गेल्यानंतर चौकशी केली असता, दोघेही मनसेचे कार्यकर्ते नसल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या हातात शिवजयंतीचं पावती बुक होतं. तिथं उपस्थित अनेकांची त्यांची कसून चौकशी केली असता, ते नालासोपारा परिसरातील रहिवासी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यातील एकाच्या खिशात शिवसेनेचं सभासद नोंदणी कार्ड सापडले. त्यामुळे जाधव यांनी पक्षात कट्टर रहा, कोणत्याही पक्षाला बदनाम करु नका असा सल्ला देवून, दोघांना सोडून दिलं.

हे ही वाचा:

चिदंबरम म्हणाले, मी प्रियांका गांधींना आधीच सांगितले होते, पण…

‘पावनखिंड’ लवकरच ओटीटी प्लॅटफोर्मवर

‘या’ देशाला दिली भारताने १ अब्ज डॉलरची मदत

नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री

मनसेच्या नावाने पावती फाडणारे आमचे कार्यकर्ते नसल्याचे शिवसेनेने सांगितले असून दोघेही भामटे होते. त्यामुळेचं ते मनसेच्या नावाने पैसे उकळत होते. मनसेनं त्यावेळीचं त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करायला हवे होते. त्यामध्ये ते कोण होते हे स्पष्ट झालं असते, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Exit mobile version