‘पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अवस्था अत्यंत केविलवाणी होती. कोणत्याही मुख्यमंत्र्यांची इतकी केविलवाणी अवस्था पाहिली नाही. या प्रकरणातील क्लिप्स खऱ्या की खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी सांगाव्यात.” असे आव्हान देतानाच कुणाला साधूसंत ठरवायचे असेल तर जरूर ठरवा, पण तुमच्या नैतिकतेचं काय? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केला.
“अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं अभिभाषण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पूजा चव्हाण प्रकरणात मुख्यमंत्र्यांची स्थिती केविलवाणी आहे. अशी स्थिती कुणाचीही होऊ नये. काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी नैतिक धैर्य त्यांना साथ देत नसल्याचं दिसत होतं. चेहऱ्यावर मास्क असतानाही आणि बोलतानाही त्यांना नैतिक धैर्य साथ देत नसल्याचं दिसून येत होतं” अशी जळजळीत टीका फडणवीस यांनी केली.
हे ही वाचा:
फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन सवाल केले. यवतमाळ मेडिकल कॉलेजात जे घडलं ते खरं की खोटं हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. त्या क्लिप्स खऱ्या की खोट्या हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं, असं सांगतानाच तुमची नैतिकता काय आहे? हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं. असं आव्हानच फडणवीस यांनी दिलं.