ठाकरे सरकारने आता कोणतीही कारवाई केली तर आम्ही १ जुनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टीव्हीवर येऊन फक्त ज्ञान देतात. त्यांना राज्याच्यादृष्टीने काय चांगला निर्णय घ्यायचाय तो घेऊ दे. पण औरंगाबादसाठी आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही. आम्ही १ जुनपासून दुकानं उघडणारच, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले. यावर आता भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनीही ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
‘मुख्यमंत्री टिव्ही वर येऊन फक्त ज्ञान देतात. आता काहीही कारवाई करा, १ जून पासून आम्ही दुकाने उघडणारच’ असा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तीयाज जलील यांनी दिला आहे. मुख्यमंत्री जे फेसबुक वरून देतात ते ज्ञान, अज्ञान की वाफा असा प्रश्न आमच्याही मनात आहे.” असे ट्विट भातखालकरांनी केले आहे.
'मुख्यमंत्री टिव्ही वर येऊन फक्त ज्ञान देतात. आता काहीही कारवाई करा, १ जून पासून आम्ही दुकाने उघडणारच' असा इशारा औरंगाबादचे खासदार इम्तीयाज जलील यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री जे फेसबुक वरून देतात ते ज्ञान, अज्ञान की वाफा असा प्रश्न आमच्याही मनात आहे. pic.twitter.com/KayEKkIdcE
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 25, 2021
मंगळवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, दुकानदारांचे हप्ते आणि त्यावरील व्याज माफ करण्यासाठी बँका तयार आहेत, असे सरकारने जाहीर करावे. अन्यथा राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला तरी आम्ही तो झुगारुन दुकानं सुरु करु. मग सरकारला जे काही करायचय ते करु द्या, असे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व नियम आणि निर्बंधांचे पालन करायला आम्ही तयार आहोत. पण राज्य सरकारने १ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी कळकळीची विनंती राज्यातील व्यापारी समाजाने ठाकरे सरकारला केली आहे.
हे ही वाचा:
लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करायला द्या
धनगर समाज आरक्षणासाठी जागर करणार
दीड महिन्याने कोरोना केसेस २ लाखांपेक्षा कमी
अनिल देशमुख, १०० कोटी प्रकरणात, ईडीकडून पाच बारमालकांची चौकशी
पुणे आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनीही ठाकरे सरकारकडे १ जुनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. ३१ मे रोजी दुकाने बंद राहिल्याचा कालावधी ५५ दिवसांचा होईल. त्यामुळे तब्बल ५० लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. परिणामी राज्य सरकारने १ जुनपासून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, असे एफआरटीडब्ल्युचे अध्यक्ष विरेन शाह यांनी म्हटले होते.