मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघाले का?

मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघाले का?

राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का? मुख्यमंत्री महोदय आता खरी गरज आहे तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची, असं ट्विट करुन भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘ड्रायविंग’ कौशल्यावर टोमणा मारला. शिवाय त्यांना परिस्थितीची जाणीवही करुन दिली. मु्ख्यमंत्रीसाहेब, आता तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आहे. ड्रायव्हिंग करत आपण कोकणात जाणार आहात का? असा सवाल चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. कोकणात पावसाने अक्षरश: हैदोस माजवलाय. अनेक ठिकाणी पूर आलाय. गावच्या-गावं पुराच्या पाण्यात अडकलीत, अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने जाणार का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत मुंबईवरुन पंढरपूरवला गेले होते. त्यांच्या ड्रायव्हिंगवरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्रही सोडलं. आता संपूर्ण कोकण पुराच्या पाण्यात असताना आणि खऱ्या अर्थाने लोकांना शासनाच्या मदतीची गरज असताना मुख्यमंत्री गाडी चालवून कोकणच्या दिशेने जाणार का?, असा खडा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय.

हे ही वाचा:

लडाखच्या विकासासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

कोकणच्या मदतीला दिल्ली तत्पर

चिपळुणात पूरपरिस्थिती, कोकणात हाहाकार

पेगॅसस हेरगिरी प्रकरणात ॲमनेस्टीचा घुमजाव

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. कोकणातल्या अनेक नद्यांना पूर आलाय. चिपळूण, महाड, या भागांत पुराच्या पाण्याने थैमान माजवलंय. “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”, अशा शब्दात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला गेले होते. त्यावरुन भाजप नेते दररोज टीका करत आहेत. गुरुवारी गोपीचंद पडळकर यांनीही निशाणा साधला.

Exit mobile version