31 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरराजकारण... म्हणून मुख्यमंत्री योगींच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

… म्हणून मुख्यमंत्री योगींच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचं रविवार, २६ जून रोजी वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मुख्यमंत्री योगी हे दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्री योगी हे दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आले होते. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पोलिस लाईन मैदानावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले. मात्र, लगेचच त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरने रविवारी वाराणसी येथील पोलीस लाईन येथून उड्डाण केले. हेलिकॉप्टरने उड्डाण करताच एक पक्षी हेलिकॉप्टरला धडकल्याने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुखरूप असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी दिली.

या घटनेनंतर मुख्यमंत्री पोलिस लाईन येथून सर्किट हाऊसमध्ये परतले. उड्डाण करताना पक्षी हेलिकॉप्टरला आदळला. त्यामुळे योगींचे काळजीपूर्वक इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर राज्याचे विमान बोलावण्यात आले असून बाबतपूर विमानतळावरून मुख्यमंत्री लखनौला रवाना होणार आहेत.

हेलिकॉप्टर सुमारे ५५० फूट उंचीवर पोहोचल्यावर अचानक एका पक्ष्याची हेलिकॉप्टरला टक्कर दिली. पायलटने सुरक्षेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर काळजीपूर्वक पोलीस लाइन मैदानावर उतरवले. हा प्रकार पाहून पोलीस व प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

हे ही वाचा:

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के देणार राजीनामा

भगतसिंह कोश्यारींना डिस्चार्ज मिळणार; राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता

बंडखोर आमदारांना निवडणूक लढवून दाखवण्याचं राऊतांकडून आव्हान

यूपीच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या तयारीत योगी सरकार

मुख्यमंत्री योगी हे दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आले होते. सर्किट हाऊस येथे विकासकामांचा आणि कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै महिन्यात होणाऱ्या प्रस्तावित दौऱ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेतला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा