मुख्यमंत्री लवकरच घराबाहेर पडणार

मुख्यमंत्री लवकरच घराबाहेर पडणार

घरात बसून इतके काम होते आहे जर घराबाहेर पडलो तर किती काम होईल, असे सांगून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तूर्तास घरातूनच काम करण्याचे संकेत दिले, पण लवकरच घराबाहेर पडणार असल्याचे नमूद केले. शिवसेनेच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला.

महाराष्ट्रात विविध संकटे आली तरी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यापासून उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नसल्याची टीका त्यांच्यावर होत राहिली. ते म्हणाले की, कोरोनामुळे मी जनतेला आवाहन करतो आहे की, घराबाहेर पडू नका. त्यामुळे मला घराबाहेर पडणे योग्य वाटत नाही. पण मी लवकरच घराबाहेर पडणार आहे. त्यामुळे येत्या काळात मुख्यमंत्री दीर्घकाळ घराबाहेर पडलेले पाहायला मिळतील, अशी अपेक्षा जनसामान्यांतून व्यक्त होऊ लागली.

हे ही वाचा:
कोरोनामुळे त्या वकिलांनी सोडला पेशा

काँग्रेसला पुन्हा स्वबळाची आठवण

प्रताप सरनाईक मातोश्रीवर?

कोण होतीस तू? काय झालीस तू??

एकीकडे काँग्रेसने सातत्याने आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा देत आहे. शिवसेनेला तो चांगलाच झोंबला. उद्धव ठाकरेंना त्याची दखल घ्यावीच लागली. त्यांनीही स्वबळाचा नारा दिला. न्याय मागण्यासाठी स्वबळ लागते पण तलवार उचलण्याची ताकद नसेल तर ती मिळवा मग वार करा, असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला.

आपल्या या संवादात त्यांनी हिंदुत्वावरून आपली श्रद्धा अद्याप कायम आहे, असे सांगून महाविकास आघाडीतील आपल्या सहकारी पक्षांना बुचकळ्यात टाकले. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व नंतर प्रादेशिक अस्मिता असे सांगताना हिंदुत्वासाठी लढण्याची तयारीही असल्याचे ते म्हणाले. एकूणच पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मार्गाने जाण्याची आगामी निवडणुकीत तयारी करत असल्याचे संकेतही या संवादातून दिसून आले.

सत्तेसाठी लाचार नाही आणि सत्तेसाठी राजकारणाचं विद्रुपीकरण सुरू आहे, असे सांगताना त्यांनी एकप्रकारे महाराष्ट्रातील राजकारणाकडेच अंगुलीनिर्देश केला.

Exit mobile version