ठाकरे सरकार अल्पमतात आल्यांनतर ठाकरे सरकराने अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ठाकरे सरकारने राज्यातील शहरांची नावे बदलण्याचे निर्णय घेतले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव नगर असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर नवी मुंबई विमानतळाचे नावही बदलून दि. बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात येणार आहे. हे निर्णय घेतल्यानंतर कॅबिनेटची बैठक संपल्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानत आता आपला रामराम घ्यावा असेच जणू म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकार्य केलेल्यांचे आभार मानले आहे. उद्धव ठाकरे राजीनामा देणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला. आभार मानतानाच आपल्या लोकांनी दगा दिल्याचेही भाष्य त्यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणीच्या सुनावणीदरम्यान उद्धव मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारले आणि ठाकरे सरकार अल्पमतात आले. ठाकरे सरकारने या कॅबिनेट बैठकीत शहरांचे नामकरण करण्याचा धडाका लावला आहे. मंत्रिमंडळात पुण्याचे नाव बदलण्याची काँग्रेसने मागणी केली आहे. पुण्याचे नाव बदलून जिजाऊ नगर करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
हे ही वाचा:
डोंबिवलीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
आम्ही उद्या मुंबईत येणार; कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
किशोरी पेडणेकरांना पून्हा त्याच नावाने धमकीचे पत्र
महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात भाषण केले. त्यावेळी त्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानले आहेत. तर माझ्याच लोकांनी दगा दिल्याने ही परिस्थिती उद्भवली, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पाच वर्षे हे सरकार चालणार असे मी म्हणालो होतो, पण माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.