मुख्यमंत्र्यांचा शहाजोग सल्ला म्हणजे निव्वळ थिल्लरपणा!

मुख्यमंत्र्यांचा शहाजोग सल्ला म्हणजे निव्वळ थिल्लरपणा!

पुणे-साकीनाक्यातील घटनेनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना राज्यपालांच्या सूचनांकडे गंभीरपणे न पाहता मोदी शहांना चार दिवसांचे अधिवेशन बोलवायला सांगा, हा मुख्यमंत्र्यांचा शहाजोग सल्ला म्हणजे निव्वळ थिल्लरपणा आहे, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील बलात्कारासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती तसेच दोन दिवसांचे अधिवेशन बोलावून त्यावर चर्चा घडवून आणावी अशी शिफारस केली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहित केंद्रानेच आता अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली.

हे ही वाचा:

बलात्काराच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘ढकल केंद्रा’वर

खड्डे, खोदकाम, वाहतूक कोंडीने वैतागले लोक

पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांना सायकल ट्रॅक मात्र हवा

१६ दिवसांनी अखेर करुणा शर्माची सुटका

त्यावर आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे की, राज्यात दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा तातडीने मंजूर करायला हवा. प्रत्येकवेळेला आलं अंगावर की ढकल केंद्रावर ही मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्य नाही. भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवत म्हटले आहे की, शक्ती कायदा लांबणीवर पडतो आहे कारण ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातच अनेक ‘शक्ती कपूर’ आहेत. बलात्कारी मंत्री, त्यावर पांघरूण घालणारे सत्तापिपासू मुख्यमंत्री असल्यावर राज्यात महिलांना न्याय मिळेल तरी कसा? भातखळकर म्हणतात की, वाढत्या महिला अत्याचाराबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हा विषय राष्ट्रव्यापी असल्याचे सांगितले, पण हा विषय राष्ट्रव्यापी असला तरी अत्याचारी मंत्र्यांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री हा विषय मात्र केवळ महाराष्ट्रविशेष आहे.

Exit mobile version