24 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरराजकारणमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री पद स्वतःकडे ठेवावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री पद स्वतःकडे ठेवावे

Google News Follow

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात एक महत्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे गृहमंत्री पद स्वतःकडे ठेवावे अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. शिवसेनेच्या गोटातून ही मागणी पुढे येत असून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ही मागणी बोलून दाखवली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडली आहे. तब्बल एक तासापेक्षा अधिक काळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. या निमित्ताने महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी मधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कामावर समाधानी नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात ही बैठक पार पडल्याचे समजते.

हे ही वाचा:

श्रीलंकेत आर्थिक संकटाचा निषेध; राजधानी कोलंबोत कर्फ्यू

किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर

‘श्रेयवादाच्या नादात अपयशाचं खापर ठाकरे सरकारवर फुटेल’

दिलीप वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! काँग्रेस-शिवसेना गृह खात्यावर नाराज असल्याची चर्चा

या बैठकीनंतरच आता गृहमंत्री पदाला अनुसरून विविध प्रस्ताव पुढे येताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह खात्याची सूत्रे आपल्या हाती घ्यावीत अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गृहखाते स्वतःकडे ठेवावे असे खैरे यांनी म्हटले आहे.

त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये पुन्हा नवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता समीकरणात गृह खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आले होते. पण आता शिवसेनेकडून गृह खात्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यात काही नवा वाद उफाळून येतो का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा