अधिवेशनाचे पाचही दिवस मुख्यमंत्र्यांची दांडीच

अधिवेशनाचे पाचही दिवस मुख्यमंत्र्यांची दांडीच

आज मंगळवार, २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस पार पडला. २२ डिसेंबर पासून सुरु झालेल्या या पाच दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकदाही विधिमंडळात फिरकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नुकतेच एका गंभीर शस्त्रक्रियेतून परतले असले तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत होते. अधिवेशनातही मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचे मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगितले जात होते. पण अधिवेशनाचे पाचही दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात फिरकले नसल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अधिवेशनाच्या आधी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून विधिमंडळात फेरफटका मारणारे मुख्यमंत्री अधिवेशन काळात का आले नाहीत? असा सवाल उपस्थित होताना दिसत आहेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर स्वरूपाची शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री अनेक दिवस राज्यकारभारापासून दूर होते. पण आता एकीकडे मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असतानाच मुख्यमंत्री मात्र अधिवेशनाला फिरकताना दिसत नाहीयेत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होणाऱ्या चहापानालाही ते अनुपस्थित होते.

हे ही वाचा:

काय आहे पंतप्रधान मोदींच्या नव्या गाडीची खासियत?

दिनेश मोंगियाचा भाजपात प्रवेश

मोदी सरकारच्या योजनेला यश, चीनला डावलून इंटेल भारतात

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीचे कारण पुढे करत, त्यांना लांब पल्ल्याचा प्रवास शक्य होणार नाही म्हणून राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुर ऐवजी मुंबईला घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण तरी मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थिती लावताना दिसले नाहीत. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री अधिवेशनाला कधी यायचं ते ठरवतील असे उत्तर काही दिवसांपूर्वी दिले होते. तर मुख्यमंत्री हे अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. पण तसे काही अधिवेशनात घडताना दिसले नाही.

Exit mobile version