एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ उडालेली असताना आता कोसळणारा डोलारा सावरण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना साद घातली. फेसबुक लाइव्ह करून त्यांनी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केलाच पण वर्षातून आपण आता मातोश्रीवर जात आहोत, अशी घोषणा ट्विटरच्या माध्यमातून केली.
रात्री मातोश्रीकडे जाताना त्यांनी वरळी, मातोश्री येथे जमलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केले. मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झालेली असतानाही त्यांनी लोकांमध्ये मिसळून लोकांची भेट घेतली. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह प्रथम सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठल्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला पण एकनाथ शिंदे व त्यांच्या कॅम्पमधील लोकांनी म्हटले तरच आपण राजीनामा देऊ असे सांगितले. पण वर्षा या शासकीय निवासस्थानातून आपण निघणार असल्याचे आणि मातोश्रीवर जाणार असल्याचे ट्विट त्यांनी केले. त्यानंतर मलबार हिल येथून निघताना काहीठिकाणी शिवसैनिकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले.
वर्षा सोडून आता ते मातोश्रीवर आले आहेत याचा अर्थ मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याच्या दिशेने मुख्यमंत्र्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. शिवसेनेचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांनी आमदारांना संध्याकाळी जमण्यास सांगितले होते अन्यथा कारवाई होईल, असा इशाराही दिला होता. पण एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतून पत्र पाठवून भरत गोगावले यांची नियुक्ती केली.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेचे ट्विट; शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू नव्हे भरत गोगावले
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या धक्क्यात २५५ लोकांचा मृत्यू
मुख्यमंत्री खुर्ची सोडण्यास तयार नाहीत!
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवार जिंकल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली कारण यात शिवसेनेची तीन मते फुटली तर काँग्रेसलाही फटका बसला. त्यांचे केवळ भाई जगताप जिंकले. चंद्रकांत हंडोरे यांना मात्र पराभव पत्करावा लागला.