महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात आज वर्षा निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर नाराज असल्याचे म्हटले जात होते. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृह खात्याच्या कामाने समाधानी असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडली आहे. तब्बल एक तासापेक्षा अधिक काळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. या निमित्ताने महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी मधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कामावर समाधानी नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात ही बैठक पार पडल्याचे समजते.
हे ही वाचा:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री पद स्वतःकडे ठेवावे
किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर
‘श्रेयवादाच्या नादात अपयशाचं खापर ठाकरे सरकारवर फुटेल’
दिलीप वळसे-पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! काँग्रेस-शिवसेना गृह खात्यावर नाराज असल्याची चर्चा
या बैठकीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात प्रशासकीय विषयांवर चर्चा करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या बैठकीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांसोबतही चर्चा केली आहे. वळसे पाटील आणि रजनीश शेठ यांच्यातही अंदाजे पाऊण तास चर्चा झाली आहे. तर संध्याकाळी ६ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री यांच्यात बैठक होणार असल्याचे समजते.