‘माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा’

‘माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा’

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अर्ध्याहून आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये आहेत. यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शुक्रवार, २४ जून रोजी म्हणजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा आणि तालुकाप्रमुखांशी संवाद साधला आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदार यांना उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद मान्य नसल्याचं म्हटलं जात आहे. यावर, माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही.वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय, पण जिद्द कायम आहे. मात्र आत्ताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे फक्त ज्यांना मी मुख्यमंत्री नको आहे त्यांनी समोर येऊन सांगावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. माझं नाव, माझा फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरत जगून दाखवा, तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालंय. तिकडे तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. मी बाळासाहेबांचे फोटो वापरून ब्लॅकमेल करत नाही. माझं आणि शिवसेनेचं नावं न वापरता जगून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी आमदारांना केले आहे.

स्वतःच्या आजारपणा बद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या शरीराचे काही भाग बंद पडत होते, त्यामुळे दोन वेळा ऑपरेशन करण्याची वेळ आली होती. मी मात्र तरीही अजून जिद्द सोडली नाही, जिद्द अजून कायम आहे. मी बरा होऊ नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेवर कारवाईची मागणी

४८ तासांत राज्य सरकारचे १६० शासनआदेश; दरेकरांनी राज्यपालांना लिहिले पत्र

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण खाली कोसळला

एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा गेम कुणाचा???

स्वप्नात देखील विचार केला नव्हता की, सोबतचे असे वागतील. झाडाची फुले, पाने आणि फांद्या घ्या, परंतु झाडाची मूळ कधी घेऊ शकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे. पुढे बाळासाहेबांचा उल्लेख करत ते म्हणाले, बाळासाहेबांचं माझ्याहून लाडकं अपत्य शिवसेना होती.

Exit mobile version