28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणआरक्षणाची जबाबदारी ढकलायला मुख्यमंत्र्यांचा लाईव्हचा खटाटोप

आरक्षणाची जबाबदारी ढकलायला मुख्यमंत्र्यांचा लाईव्हचा खटाटोप

Google News Follow

Related

बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल देत महाराष्ट्रातील मराठा समाजचे आरक्षण घटनाबाह्य ठरवले आहे. महाराष्ट्राचे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करायला अपयशी ठरल्यामुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले असून ठाकरे सरकारकडून केंद्र सरकारकडे बोट दाखवत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हेच करण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवार, ५ मे रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुरुवातीला राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केले आणि नंतर मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला.

हे ही वाचा:

मराठा आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले

ठाकरे सरकारची सर्वोच्च न्यायालयावर आगपाखड

ठाकरे सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक

…तर देशभरातील भाजपा कार्यकर्ते प. बंगालमध्ये धडकतील

काय म्हणाले मुख्यमंत्री?
मराठा आरक्षणाच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की आरक्षणाची बाजू मांडताना सरकार कुठेही कमी पडले नाही. ज्या वकिलांनी उच्च न्यायालयात बाजू मंडळी होती त्यांनीच सर्वोच्च न्यायालयातही राज्याची बाजू मांडली. त्यापेक्षाही अधिक वकिलांची आपण त्यांना मदत मिळवून दिली. सर्वांची मदत घेऊन आपण लढलो पण तरीही पदरी निराशा आली आहे. पण निराश झाला तर तो महाराष्ट्र कसला? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. याचवेळी त्यांनी मराठा समाजचे आभार मानले कारण त्यांनी सामंजस्याने प्रतिक्रिया दिल्या.

सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल देतानाच आपल्याला मार्ग दाखवला आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखवले. सर्वोच्च न्यायालय म्हणाले की राज्याला आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकारच नाहीये. हा अधिकार केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींचा आहे. मी त्यांना हात जोडून विनंती करतो की आपण ३७० कलम हटवताना जी हिम्मत दाखवली तीच हिम्मत आणि संवेदनशीलता परत दाखवा. केंद्र सरकारने या आधी जसे शहा बानो खटल्यात आणि ऍट्रॉसिटी कायदयाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली तीच आता घ्यावी. तुम्हाला राज्य सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच आपण राष्ट्रपाती, पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले. त्यांना दिल्लीत जाऊन भेटण्याची आपली तयारी असल्याचे मुख्यमंत्र्यी म्हणाले. तसेच त्यांनी मराठा समाजाच्या नागरिकांना संयम आणि शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा