बलात्काराच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘ढकल केंद्रा’वर

बलात्काराच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘ढकल केंद्रा’वर

‘आले अंगावर की ढकल केंद्रा’वर याची प्रचीती पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रातून दिसून आली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महिला अत्याचारांसंदर्भात दोन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन बोलावण्याची शिफारस करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिल्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तरादाखल राज्यपालांना पत्र लिहित बलात्कारांबाबत केंद्रानेच आता अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे लसीकरण, कोरोना, नैसर्गिक आपत्तीसाठी आर्थिक मदत याबाबत सातत्याने केंद्राकडे बोट दाखविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी बलात्काराच्या गंभीर मुद्द्यावरही केंद्रावरच जबाबदारी ढकलली आहे.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मुंबई, अमरावती, पुणे अशा अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्यानंतर ठाकरे सरकारची कोंडी झाली होती. साकीनाका, अंधेरी येथे तर महिलेवर घृणास्पद अत्याचार झाले. त्यामुळे पुन्हा एकदा निर्भया प्रकरणाची आठवण झाली. त्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चिंता प्रकट केली आहे. विधिमंडळाचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलावण्याची विनंतीही त्यांनी केली. पण त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी राज्यपालांना पत्र लिहून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, भाजपशासित राज्यांत कशी बलात्कारांमुळे नाचक्की होत आहे, याबद्दल चिंता व्यक्त केली. यासंदर्भात राष्ट्रव्यापी चर्चा व्हायला पाहिजे, अशी मागणी करत केंद्राकडे बोट दाखविले आहे.

हे ही वाचा:

१६ दिवसांनी अखेर करुणा शर्माची सुटका

खड्डे, खोदकाम, वाहतूक कोंडीने वैतागले लोक

पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्यांना सायकल ट्रॅक मात्र हवा

जस्टिन ट्रुडो यांनी पायावर धोंडा पाडून घेतला

देशातील बलात्कारांबाबत अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी करावी, अशी विनंती करत ती जबाबदारीही मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांवर टाकली आहे.

Exit mobile version