महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वीकेंड लॉकडाऊन केल्यानं प्रथमच राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादामध्ये ते वीकेंड लॉकडाऊनला राज्यातील जनतेने दिलेला प्रतिसाद, राज्यातील कोरोना लसीकरण, रक्तदान, सरकारी आणि खासगी कार्यलयांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरु करणे याबाबत संवाद साधण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या संवादामध्ये महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याबाबत घोषणा करु शकतात.
हे ही वाचा:
दलित भिकारी नाही, तर दलित शिकारी आहेत
तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत, आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?
बलात्काराचा आरोपी राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील अशी माहिती दिली होती. “महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच निर्णय घेतील. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल”, असं मुंबईचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनी आज माध्यमांना सांगितलं होतं.