भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मुंबई प्रदेशाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रावरून ठाकरे सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “गृहमंत्र्याला हे आदेश कोणी दिले होते हेही आता लवकरच स्पष्ट होऊ द्या” असे भातखळकर म्हणाले आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडल्यापासून महाराष्ट्रात रोज नवे गौप्यस्फोट होत आहेत. या प्रकरणात महाराष्ट्रातील गृहखात्याचा कुरूप चेहरा जनतेसमोर आला असून यात आता खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव समोर येत आहे. अंबानींच्या प्रकरणात सचिन वाझेला अटक झाली, तर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील पोलिसांकडून चुका झाल्याचे आणि या बदल्या ‘रुटीन बदल्या’ नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता शनिवारी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पात्र लिहून थेट गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. सचिन वाझे ह्याला स्वतः गृहमंत्र्यांनी दर महा १०० कोटी आणून देण्यास सांगितले होते असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. या पत्रामुळे महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने पोलिसच खंडणीची एखादे रॅकेट चालवत होते का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दर महा 100 कोटीची वसुली करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दिले होते असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. गृहमंत्र्याला हे आदेश कोणी दिले होते हेही आता लवकरच स्पष्ट होऊ द्या… pic.twitter.com/2eo5FRSnRu
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 20, 2021
“दर महा १०० कोटीची वसुली करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दिले होते असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. गृहमंत्र्याला हे आदेश कोणी दिले होते हेही आता लवकरच स्पष्ट होऊ द्या” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
हे ही वाचा:
मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासही आता एनआयएकडे
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाच्या जागी अजून एक मृतदेह
दर महा १०० कोटी पोहोचवण्याचे सचिन वाझेला गृहमंत्र्यांचे आदेश, परमबीर सिंह यांच्या आरोपांनी खळबळ
वाझे हे लादेन आहेत का? असा सवाल करत त्यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जनतेसमोर येऊन दरमहा १०० कोटीच्या वसुलीचा खुलासा करावा. वाझे हा ठाकरे सरकारचा वसुली अधिकारी असल्याचा मा. देवेंद्र फडणवीस यांचा आरोप आता सिद्ध झाला आहे.