“उद्धव ठाकरे यांनी ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये.”

“उद्धव ठाकरे यांनी ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये.”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची हिंमत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कधीही आपल्या भाषणात ‘मी मर्द आहे‘ असा उल्लेख करु नये.” अशी जळजळीत टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.

“ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवत आहे. पूजा चव्हाण प्रकरणात सर्व बाजूंनी अडकलेले संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतात. कॅबिनेट मिटिंगला येऊन बसतात. तरीही त्यांचा राजीनामा घेण्याचं धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे’.” असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आपले सरकार शिवशाहीचं असल्याचं सांगतात. मात्र, हे सरकार शिवशाहीचं आहे, हे आता कृतीतून दाखवण्याची वेळ आली आहे. शिवशाहीत बलात्काऱ्यांचा चौरंग व्हायचा. आता चौरंग करता येत नाही, पण किमान गच्छंती करा, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.” अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली.

हे ही वाचा:

“सिनिअर पीआय दीपक लगड यांना चालवणारा बाप कोण आहे? हे आम्ही शोधून काढू”

सत्तेसाठी सर्व प्रकारच्या तडजोडी हे महाविकास आघाडीचं सरकार आणि मुख्यमंत्री करत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

Exit mobile version