‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’

‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’

काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक काल (१६ ऑक्टोबर) पार पडली. या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जी- २३ नेत्यांना मीच पूर्ण वेळ अध्यक्ष असल्याचे सांगितले. तसेच अध्यक्षपदासाठीची निवडणूक लवकरच होईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसला टोला लगावत म्हटले की, काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे.

शिवराज सिंह चौहान हे खंडवा मतदरासंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते. तेव्हा ते म्हणाले की, दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. हा पक्ष असा आहे ज्यांचा कोणी अध्यक्ष नाही. सोनिया गांधी या कार्यकारी अध्यक्ष आहेत. राहुल गांधी कोणीच नाहीत, तरीही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा निर्णय़ ते घेतात. हे सगळे सर्कस सारखे झाले, असा टोला शिवराज सिंह चौहान यांनी लगावला.

पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदावरून कॅप्टन यांना हटवून चन्नींना बसवले आहे. तर सिद्धू आम्ही बुडणार आणि तुम्हालाही घेऊन बुडणार म्हणतात. छत्तीसगढमध्येही असेच फिफ्टी फिफ्टी सुरु आहे.

हे ही वाचा:

पवारसाहेब किती हा भाबडेपणा?

‘ब्रिटीश खासदाराच्या हत्येमागे इस्लामी दहशतवादी’

अवघ्या २९ वर्षांचा क्रिकेटपटू अवि बरोटचे झाले निधन

‘स्वच्छता कामगारांसाठी बांधलेल्या घरांमध्ये १८४४ कोटींचा घोटाळा’

मध्य प्रदेशात काँग्रेस कमलनाथ यांच्यापुरतीच मर्यादीत असल्याचेही शिवराज सिंह चौहान म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये याआधीच्या कमलनाथ सरकारच्या धोरणांवरही त्यांनी टीका केली. भाजपच्या जुन्या सर्व कल्याणकारी योजना बंद केल्या होत्या. पुन्हा भाजप सरकार आले तेव्हा कोरोनाचे संकट असतानाही विकासकामे सुरु केल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले.

Exit mobile version