एका आदिवासी कष्टकऱ्यावर लघवी करणाऱ्या प्रवेश शुक्ला नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी गुरुवारी या कामगाराची भेट घेतली. शिवराजसिंग यांनी या कामगाराचे पाय धुतले आणि एकप्रकारे या घटनेबद्दल क्षमा मागितली.
प्रवेश शुक्ला या व्यक्तीने या आदिवासी कष्टकऱ्यावर मूत्रविसर्जन केले होते. त्याचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा प्रवेश शुक्ला नावाचा व्यक्ती भाजपाशी संबंधित असल्याचे सांगितले जात होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर शुक्लाला अटक करण्यात आलीच शिवाय, त्याच्या घरावर बुलडोझरही फिरविण्यात आला. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दशमत रावत या कष्टकऱ्याची माफी मागितली तसेच त्यांचे पायही धुतले. त्याचा व्हीडिओ चौहान यांनी आपल्या ट्विटरवर टाकला.
मन दु:खी है; दशमत जी आपकी पीड़ा बाँटने का यह प्रयास है, आपसे माफी भी माँगता हूँ, मेरे लिए जनता ही भगवान है! pic.twitter.com/7Y5cleeceF
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 6, 2023
त्या ट्विटमध्ये शिवराज चौहान यांनी म्हटले आहे की, मन दुःखी आहे. दशमत यांना ज्या वेदना झाल्या आहेत, त्याबद्दल मनात संवेदना आहेत. मी त्यांची माफी मागतो. जनता ही माझ्यासाठी परमेश्वर आहे.
हे ही वाचा:
सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध
दोघात तिसरा आला,आता बळ कुणाचे वाढेल?
शरद पवारांच्या राजकारणाची कथा आटोपली काय?
महायुतीचे सरकार ठाकरे, पवार कुटुंबिय विरहित सरकार
शिवराज सिंग यांनी बुधवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी जेव्हा ही घटना पाहिली तेव्हापासून मला अत्यंत वेदना झाल्या. तेव्हापासून मी दशमत यांना भेटून त्यांचे सांत्वन करण्याचा विचार करत होतो. त्यांना न्याय मिळेल हा विश्वासही मला त्यांना द्यायचा होता. त्यानंतर मी दशमत यांच्या घरी गेलो आणि त्यांच्याशी तसेच त्यांच्या परिवाराशी मी संवाद साधला आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. प्रवेश शुक्लाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता त्याच्यावर २९४ (अश्लिल कृत्य) आणि ५०४ (समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर राज्य सरकारने प्रवेश शुक्लाच्या घरावर कारवाई करत त्या घराचा काही भाग बुलडोझरच्या सहाय्याने पाडला.