गडचिरोतील दुर्गम भागात मुख्यमंत्री शिंदे पोलिसांसोबत साजरी करणार दिवाळी

गडचिरोतील दुर्गम भागात मुख्यमंत्री शिंदे पोलिसांसोबत साजरी करणार दिवाळी

राज्यासह देशभरात दिवाळीचा उत्साह असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोली येथे दिवाळी साजरी करण्यासाठी जाणार आहेत. तिथे ते पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्याचबरोबर भामरागडमधल्या पोलिस मदत केंद्रालाही भेट देणार आहेत. त्यानिमित्ताने भामरागडमध्ये आता कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गडचिरोली येथील दुर्गम भागात भेट देणार आहेत. यावेळी ते पोलिसांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्याचबरोबर भामरागडमधल्या पोलिस मदत केंद्रालाही मुख्यमंत्री शिंदे भेट देणार आहेत. त्यानिमित्ताने भामरागडमध्ये आता कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकास मंत्री होते, तसेच ते गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेकदा गडचिरोलीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना नक्षलवाद्यांक़डून जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या.

दरम्यान, कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमध्ये जाऊन दिवाळी साजरी केली होती. दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात.

हे ही वाचा:

जो बायडन यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा जल्लोष

म्यानमारमध्ये लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू

ब्रिटनची गडगडलेली अर्थव्यवस्था सावरायला भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधानपदी

जवान देशभक्तीपर गाणी गात असताना पंतप्रधान मोदींनी घेतला आनंद

“कारगिलची दिवाळी कधीच विसरता येणार नाही. कारगीलने प्रत्येक वेळी भारताचा विजय केला आहे. हे भारताच्या विजयाचं प्रतीक आहे, दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा उत्सव आहे त्यामुळे मी कारगिलच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही” असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Exit mobile version